१३ व्या शतकापासून चालत आलेला काठी संस्थानचा आदिवासी दसरा महोत्सव संपन्न... दिनू गावित
महाराष्ट्र

१३ व्या शतकापासून चालत आलेला काठी संस्थानचा आदिवासी दसरा महोत्सव संपन्न...

तेराव्या शतकापासुनची पंरपरा असलेला नंदुरबार जिल्ह्यातल्या काठी संस्थानचा आदिवासी दसरा महोत्सव पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत विधीवत पुजेसह संपन्न झाला आहे.

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार: तेराव्या शतकांपासुनची पंरपरा असलेला नंदुरबार जिल्ह्यातल्या काठी संस्थानचा आदिवासी दसरा महोत्सव विधीवत पुजेसह संप्पन झाला. याठिकाणी होणारी घोड्यांची शर्यत खऱ्या अर्थाने आकर्षणाचा विषय असतो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घोड्यांची शर्यत होवु शकलेली नाही. त्यामुळे आदिवासी बांधवांची मोठी हिरमोड झाल्याचे पहावयास मिळाले. (Tribal Dussehra Festival of Kathi Sansthan, which has been going on since 13th century)

हे देखील पहा -

१३ व्या शतकांपासुन काठी संस्थानचे राजा राजे उमेदसिंग यांनी या दसरा महोत्सवाला सुरवात केली होती. या आदिवासी राजाच्या घराण्यातील १८ वी पिढी याठिकाणी दसरा पुजन करत आहे. या दसऱ्याच्या महोत्सवात नोवाया आणि दोहरा खांबाचे पुजनासह राजांची गादी आणि शस्त्र पुजन होते. नोवाया खांब हा निसर्ग देवतेचे प्रतिक मानुन याठिकाणी धान्य आणि पिकांचे पुजन केलं जाते. तर दोहरा खांब हा रावण राजाचे प्रतिक म्हणुन आजही पुजला जातो. या पंरपरांचे आदिवासी बांधवामध्ये अनन्यसाधारण महत्व असुन कुठल्याही वादविवादासहित या पंरंपरा आजतागायत सुरु आहे.

या दसऱ्या मेळाव्याच्या पाश्वभूमीवर राज्याचे आदिवासी मंत्री के.सी पाडवी यांनी देखील काठी येथे जावुन या संस्थानच्या राजांच्या गादीचे दर्शन घेत शस्त्र पुजनाची विधी केली. यावेळी याठिकाणी गत वैभव आणुन देण्यासाठी आदिवासी विकास खात्याकडुन प्रयत्नशील राहणार असल्याचे मंत्री पाडवी यांनी सांगितले. 

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रायगडात सुनील तटकरे यांचा भरत गोगावले यांना दे धक्का

Ankita Walawalkar : कचऱ्याचा ढीग पाहून अंकिता वालावलकर संतापली; म्हणाली- "गेटवर नाव महाराजांचं,पण..."

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना अजून एक धक्का! ९५२६ महिलांचे अर्ज बाद; कारण काय?

Samosa Recipe : चटपटीत-खुसखुशीत समोसा बनवायचाय? परफेक्ट भाजीची रेसिपी पाहा

Raj Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे जाणार राज ठाकरेंच्या घरी, तारीख ठरली?

SCROLL FOR NEXT