भंडारा जिल्ह्यात नेटवर्क असलेले झाड ! अभिजित घोरमारे
महाराष्ट्र

भंडारा जिल्ह्यात नेटवर्क असलेले झाड !

ऑनलाइन शिक्षणासाठी जेवनाळा गावातील विद्यार्थ्यांना व नेटसर्फिंग करणाऱ्या युवकांना झाडावरची कसरत करावी लागत आहे !

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजित घोरमारे

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील जेवनाळा गावात सकाळी 11 वाजले कि विद्यार्थ्यांची एकच घाई सुरु होते. गावामध्ये नेटवर्क झाड म्हणून गावात फेमस असलेल्या कडूनिंबाच्या झाडावर चढून ऑनलाइन अभ्यास करतात. जेवनाळा गावात मोबाईल टॉवर असून देखील घरी मोबाईलला रेंज मिळत नाही. Tree with network in Bhandara district

गावात टॉवर असतांना सुद्धा मोबाइल वर साधी रेंज मिळत नसल्यामुळे टॉवर जवळ 200 मिटर अंतरावर असलेल्या कडुनिंबाच्या झाडावर इंटरनेटची स्पीड चांगली मिळत असल्याने गावातील युवक व विद्यार्थी इंटरनेटसाठी या कडूनिंबाच्या झाडाजवळ आश्रय घेतात. नेटसर्फिंग करण्यासाठी जेवनाळा गावातील युवकांची या कडूनिंबाच्या झाडाजवळ सतत मांदियाळी राहत असल्याने गावात हे झाड 'नेटवर्क झाड' म्हणून प्रसिद्ध झाले आहे.

जेवनाळा गावात मोबाइल टॉवर असून ही कित्येक वर्षांपासून मोबाइल रेंजची समस्या आहे. गावात साधा कॉल ही लागत नसल्याने तिथे इंटरनेट ची काय बिसाद! ही परिस्थिती उद्भवली आहे. यात मात्र विद्यार्थ्यांची घुसमट होत असून शाळा ऑफलाइन तर शिक्षण ऑनलाइन झाल्याने, ऑनलाइन शिक्षणासाठी जेवनाळा गावातील विद्यार्थ्यांना व नेटसर्फिंग करणाऱ्या युवकांना झाडावरची कसरत करावी लागत आहे!

पाऊस आला तर क्लासला उपस्थित राहता येत नाही. आता तर चक्क पावसाळा लागलाय त्यामुळे आता बिकट परिस्थिती सुरु झाल्याचे गावातील युवक सांगतायत. आपल्या पाल्याची अभ्यासासाठी सुरु असलेल्या धडपडीने पालक ही गहिवरले असून प्रशासनाने नेटवर्क ची समस्या सोडवण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.

कोरोनामुळे दीड वर्ष झाले शाळा बंद आहे. मात्र आजची पिढी घडवण्यासाठी शाळेकडून विद्यार्थी हित लक्षात घेता ऑनलाइन शिक्षण सुरु ठेवले आहे. असे असतानासुद्धा ग्रामीण भागात मोबाइलला साधे नेटवर्क मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यामुळे शासन प्रशासनाकडून त्वरित या घटनेची दखल घेणे तितकेच गरजेचे आहे. कारण प्रश्न शेवटी विद्यार्थ्यांचा आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT