transport vehicles accident at tadkalas purna road near parbhani  saam tv
महाराष्ट्र

Parbhani Accident News : ताडकळस-पूर्णा मार्गावर मालवाहतूक वाहनांचा भीषण अपघात, एक ठार

या घटनेचा तपास ताडकळस पाेलीस करीत आहेत.

राजेश काटकर

Parbhani Accident News :

परभणी जिल्ह्यातील ताडकळस येथील पिंगळघड नाल्यावर दाेन माल वाहतुक वाहनांच्या झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. पाेलीस या घटनेचा तपास करीत आहेत. (Maharashtra News)

या अपघाताबाबत पाेलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथे काल रात्री नऊच्या सुमारास पूर्णा येथून ताडकळसकडे येणारे एक माल वाहतुकीचे वाहन आणि ताडकळसहून पूर्णाला जाणाऱ्या दुस-या माल वाहतुकीच्या वाहनाची समोरासमोर टक्कर झाली. ही टक्कर इतकी भीषण हाेती की दाेन्ही गाड्यांचे माेठे नुकसान झाले.

या घटनेत एका माल वाहतुकीच्या गाडीचे चालक विजय रावसाहेब मुस्तापुरे (वय 48, राहणार कोनेरवाडी तालुका पालम) यांचा जागीच मृत्यू झाला. पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या घटनेतील जखमींना परभणी येथे उपचारासाठी पाठवण्यात आले. ताडकळस पोलीस पुढील तपास करत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gas Cylinder: मोठी बातमी! यापुढे डबल मिळणार गॅस सिलिंडर, LPG बाबत केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय

चुकून दुसऱ्याची चप्पल घातल्याने रक्तरंजित थरार; डोक्यात विटा घालून एकाला संपवलं, नागरपूर हादरलं

Shocking : हृदयद्रावक! मध्यरात्री घरावर बॉम्ब हल्ला, आईच्या कुशीत झोपलेल्या २ चिमुकल्यांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: अशोक खरातप्रकरणी आणखी दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी गोत्यात सापडण्याची शक्यता

Gold Rate Today: खुशखबर! सोनं झालं स्वस्त, प्रति तोळ्यामागे तब्बल इतक्या रुपयांची घसरण, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

SCROLL FOR NEXT