st employees arrears  Saam tv
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; वेतन वाढीचे थकीत हप्ते कधी मिळणार? तारीख आली समोर

st employee : एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वेतन वाढीच्या थकीत हप्त्याबद्दल मंत्री प्रतापसरनाईक यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

Vishal Gangurde

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी शासन कटिबद्ध

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली ग्वाही

शासनाने १०० कोटी रुपये तातडीने अदा केले

एसटीच्या सुमारे ८६ हजार कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन वाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत देण्यात येणारा वेतन वाढीचा थकीत हप्ता कर्मचाऱ्यांच्या बॅक खात्यात जमा होईल. परिवहन मंत्री अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याविषयी माहिती दिली आहे. यामुळे येत्या २४ फेब्रुवारीला काही कामगार संघटनांनी पुकारलेले आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन देखील सरनाईक यांनी केलंय.

'एसटी कर्मचाऱ्यांना वेतन वाढीच्या थकीत हप्ता देण्यासाठी महामंडळाकडे पैसे नसल्याने शासनाने ती जबाबदारी उचलावी. याविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी केली होती. या बैठकीत ठरल्यानुसार दरमहा सुमारे ६५ कोटी रुपये शासनाने अनुदान स्वरूपात एसटीला देण्याचे ठरले होते, अशी माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत हप्ते डिसेंबर महिन्याच्या वेतनासोबत देण्यास सुरुवात झाली. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत सदर हफ्ता देण्यासाठी महामंडळाकडे पुरेसा निधी उपलब्ध नव्हता. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे हप्ते थकले होते. परंतु थकीत हप्ता न मिळाल्याने फसवणूक झाल्याची भावना एसटी कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्ती केली होती.

थकीत हप्ते मिळवण्यासाठी काही कामगार संघटनांनी आंदोलनाच्या पवित्रा घेतला होता. आंदोलनाचा पवित्रा स्वीकारल्याने त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांचीशी चर्चा केली. त्यानंतर या थकीत हप्त्यापोटी २१० कोटी रुपये तातडीने सरकारने एसटीला द्यावेत, अशी विनंती मंत्री सरनाईक यांनी केली.

कर्मचाऱ्यांचे २१० कोटी रुपयांपैकी १०० कोटी रुपये आज शासनाने दिले आहे. तसेच उर्वरित निधी देखील लवकरच प्राप्त होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचे हप्ते कोणते परिस्थितीमध्ये देण्यात येतील, असे आश्वासन मंत्री सरनाईक यांनी दिलं आहे. दहावी आणि बारावीच्या मुलांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यांच्या प्रवासात अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी संघटनांनी आंदोलन स्थगित करावं, असे आवाहन देखील त्यांनी केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : मोठी बातमी: मुंबईत भाजप आमदाराच्या कारचा भीषण अपघात, फ्री वे वर ३ वाहनांना धडक

Maharashtra News Live Update: रोहित पवारांचा दुष्काळी दौरा; ‘काजू-बदाम खाऊन तरी बुद्धी चालवा’, सरकारवर जोरदार टीका

मोठी बातमी! मिरजमध्ये सरकारी रुग्णालयाचा स्लॅब कोसळला; 6 जण ढिगाऱ्याखाली अडकले, 2 जणांचा मृत्यू

8th Pay Commission Update: 3.25 फिटमेंट फॅक्टरची मागणी चर्चेत; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी अपडेट

Actress Death: चित्रपटसृष्टीला मोठा धक्का; ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

SCROLL FOR NEXT