Nashi Accident  Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Accident: आईसोबतचा तो प्रवास ठरला अखेरचा! दुचाकीवरुन जाताना अंगावर पडली झाडाची फांदी, महिलेचा जागीच मृत्यू तर मुलगा गंभीर

Nashi Accident News: नाशिकमध्ये दुचाकीवर झाडाची फांदी पडल्याने अपघात झाला. या अपघातामध्ये आईचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला. जखमीवर नाशिकच्या जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Priya More

तरबेज शेख, नाशिक

नाशिकमध्ये दुचाकीवर झाडाची फांदी पडल्याने महिलेचा मृत्यू झाला तर मुलगा जखमी झाला आहे. नाशिकच्या गंगापूर रोड येथे असलेल्या सोमेश्वर बस स्टॉपजवळ सकाळी ही घटना घडली. गंगापूर गावाकडून शिवाजीनगरकडे जात असताना दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या महिलेच्या अंगावर झाडाची फांदी पडली. त्यामुळे दुचाकीवरून दोघेही पडले. या अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर महिलेचा मुलगा जखमी झाला. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये दुचाकीवर झाड पडल्याने निष्पाप महिलेचा मृत्य झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. तर या महिलेचा मुलगा अपघातामध्ये जखमी झाला आहे. गंगापूर गावाकडून शिवाजीनगरकडे दुचाकीने आई आणि मुलगा जात होते. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास प्रवास करत असताना अचानकपणे सोमेश्वर थांब्याजवळ रस्त्यालगतची झाडाची धोकादायक फांदी त्यांच्यावर कोसळली आणि दोघेही दुचाकीवरून खाली पडले.

यावेळी झाडाच्या फांदीखाली दबल्यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले. रक्तबंबाळ अवस्थेत दोघांनाही नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी ५५ वर्षीय अलका सोनवणे यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी अलका सोनवणे यांना तपासून मृत घोषीत केले. तर त्यांचा ३५ वर्षीय मुलगा दीपक सोनवणे यांच्या डोक्याला, छातीला आणि डाव्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी दीपक यांच्यावर जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. नाशिक शहरापासून गंगापूरपर्यंत अनेक धोकादायक वृक्ष आणि अनेक झाडांच्या धोकादायक फांद्या या रस्त्यात आल्या आहेत. यातीलच एका धोकादाय झाडाच्या फांदीने महिलेचा बळी घेतला. त्यामुळे नागरिकांकडून प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. महिलेच्या मृत्यूनंतर आता परिसरात धोकादायक झाडांच्या फांद्या तोडायचं काम सुरू झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hyperloop Rail: देशातील पहिली हायपरलूप रेल्वे कधी धावणार? जाणून घ्या, नव्या रेल्वेचा मार्ग

Ration Card Holder: राज्यातील 3 हजार रेशन कार्डधारकांना नाही मिळणार रेशन; काय आहे कारण?

Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं; मनोज जरांगे समर्थकांकडून बीड जिल्हा बंदची हाक, VIDEO

EPFO 3.0 लाँन्च होण्यास का होतोय विलंब? कोणत्या पाच नियमात होतील बदल? जाणून संपूर्ण माहिती

Horrific : दुहेरी हत्याकांडाने खळबळ; घरगुती वादातून जावयाने केली मायलेकीची हत्या

SCROLL FOR NEXT