Sambhajinagar News  Saam tv
महाराष्ट्र

Shocking : खिशात पैसा नाही, मुलांसाठी दिवाळीत कपडे अन् फराळ कुठून आणू?, चिंतेतून शेतकऱ्याने संपवलं आयुष्य

Sambhajinagar News : संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्याने दिवाळीच्या खरेदीसाठी पैसे नसल्याने आत्महत्या केली. अतिवृष्टी, पीकनुकसान आणि शासनाकडून मदत न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

Alisha Khedekar

दिवाळीच्या खरेदीसाठी पैसे नसल्याने संभाजीनगरातील शेतकऱ्याची आत्महत्या

अतिवृष्टी, पीकनुकसान आणि बँक कर्जाचा ताण कारणीभूत

कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे

शासनाने मदत आणि नुकसानभरपाई तातडीने जाहीर करण्याची मागणी

संभाजीनगरमध्ये हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतकऱ्याने घरी दिवाळीच्या सणासाठी खरेदीला पैसे नाहीत म्हणून आत्महत्या केली आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. शेतकऱ्याची अवस्था पाहून कुटुंबीयांना देखील अश्रू अनावर झाले आहेत. ही घटना मनाला सुन्न करणारी ठरली. नामदेव लालसिंग राठोड असं या मृत शेतकऱ्याचं नाव आहे.

मे महिन्यापासून सुरु झालेल्या पावसाने राज्यात धुव्वादार बॅटिंग केली. अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यावर ओल्या दुष्काळाचं संकट ओढवलं. हातातोंडाशी आलेलं पीक शेतकऱ्यांनी गमावलं. यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं. शेतकऱ्यांनी या नुकसानाची भरपाई म्हणून सरकारला साकडे घातले. दुष्काळामुळे झालेल्या नुकसानापाई अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. अशीच एक घटना संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील तुपेवाडी तांड्यात घडली आहे.

नामदेव लालसिंग राठोड यांनी अतिवृष्टीने पिकांचे झालेले नुकसान, सततची नापिकी, बँकांचे घेतलेले पीककर्ज आणि लोकांची उसणवारी, त्यात शासनाची अतिवृष्टीची मदतही नाही, हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण दिवाळी डोक्यावर आल्याने लेकराबाळांसह घरच्यांना कपडे आणि इतर साहित्य कसे खरेदी करावे, या विवंचनेत घरासमोर विषारी औषधी प्राशन करून आत्महत्या केली.

या घटनेने तुपेवाडी तांडा परिसरात शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच नामदेव यांच्या कुटुंबियातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान अशा घटनेनंतर तरी सरकारला जाग येणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिबट्यांचा धुमाकूळ थांबवण्यासाठी सरकारची मोठी घोषणा: ‘नसबंदी’ला हिरवा कंदील

Delhi Bomb Blast: भारतातही हमासप्रमाणे हल्ल्याचा कट; उमरच्या आणखी एका साथीदाराला अटक, NIAची मोठी कारवाई

Mithila Palkar: कपसाँग गर्ल मिथिला पालकरचा नवा ग्लॅमरस अवतार पाहिलात का?

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी राज–उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र! युतीची पायाभरणी?

आता पक्षासारखं हवेत उडा? पंख लावून माणसाला हवेत उडता येणार?

SCROLL FOR NEXT