kolhapur  Saam tv
महाराष्ट्र

कोल्हापुरात प्रेमीयुगुलाच्या प्रेमाचा भयानक शेवट; जंगलात आढळले दोघांचे मृतदेह, परिसरात खळबळ

kolhapur News : कोल्हापुरात प्रेमीयुगुलाच्या प्रेमाचा भयानक शेवट झाल्याचे समोर आलं आहे. या कपलचा मृतदेह जंगलात आढळला.

Vishal Gangurde

कोल्हापुरात घडली दुर्देवी घटना

प्रेमीयुगुलाने आयुष्य संपवलं

दोघांच्या निर्णयाने राधानगरीत खळबळ

कोल्हापुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या शेळेवाडीतील ओंकार उर्फ उदय आणि अल्पवयीन मुलीने टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राधानगरीतील जंगलात दोघांनी झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. दोघांच्या आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार आणि त्याची प्रेयसी एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. दोघांनी जंगलात आत्महत्या केल्याचा गावातल्या पोलीस पाटलांना कळालं. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले. त्यानंतर दोघांवर शुक्रवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.

ओंकारचे नातेवाईकांच्या माहितीनुसार, तो कष्टाळू आणि मनमिळाऊ स्वभावाचा मुलगा होता. त्याच्याकडे कारखान्याकडे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर होता. गावातील यात्रेत त्याचा विशेष सहभाग असयाचा. त्याने टोकाचा निर्णय घेतल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. दोघांनी टोकाचं पाऊल का उचलले, याचा शोध घेण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून पोलिसांकडून होत आहे.

प्रेमप्रकरणातून आत्महत्या?

प्रेमप्रकरणात उद्भवलेल्या नैराश्यातून दोघांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. कोल्हापूरच्या तरसंबळे जंगलात दोघांनी आत्महत्या केली. ओंकारचे वय हे २८ होतं. तर त्याच्या प्रेयसीचे वय १७ होते. दोघे एकाच दोरीने बांधले गेले होते. दोघांनी चार दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शैक्षणिक कर्जाची मर्यादा ५ वरून २० लाख करा; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची मागणी, सुनेत्रा पवारांची घेतली भेट

PM Modi Photo Removal Case: मनसेच्या नेत्याला मुंबईतून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Nepal Flood: महापुरात घरं वाहून नेली, पण निष्ठा नाही! मालकाच्या प्रतीक्षेत कुत्रे ढिगाऱ्याजवळ ठाण मांडून

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना आणखी धक्के बसणार? 6 नगरसेवक सोडणार ठाकरेंची साथ, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

जमिनीसाठी आई-बापाच्या जीवावर उठले, निर्लज्ज मुलांची आई-वडिलांना भररस्त्यात मारहाण

SCROLL FOR NEXT