Sambhajinagar Shocking News  Saam Tv
महाराष्ट्र

Sambhajinagar: ट्रॅक्टर धुण्यासाठी गेले, पण परत आलेच नाहीत; ४ मुलांचा खदानीत बुडून दुर्दैवी मृत्यू

Sambhajinagar News: संभाजीनगरमध्ये ट्रॅक्टर धुण्यासाठी गेलेल्या ४ मुलांचा खदानीमध्ये बुडून मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात ही घटना घडली. मृतांमध्ये ३ मुलं एकाच कुटुंबातील होती.

Priya More

Summary -

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये दसऱ्याच्या दिवशी मोठी दुर्घटना घडली.

  • ट्रॅक्टर धुण्यासाठी खदानीवर गेलेल्या ४ मुलांचा बुडून मृत्यू झाला.

  • मृतांमध्ये ३ मुलं एकाच कुटुंबातील होती.

  • या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

दसरा सणाला गालबोट लागल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली. याठिकाणी ट्रॅक्टर धुण्यासाठी गेलेल्या ४ मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात ही घटना घडली. चार मुलं खदाणीमध्ये टॅक्टर धुण्यासाठी गेली होते. टॅक्टर धुवत असताना त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृतांमधील ३ मुलं एकाच कुटुंबातील होती. या घटनेमुळे संभाजीनगरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टर धुण्यासाठी खदानीत गेलेल्या चार मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली. जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लिंबेजळगाव येथे दसऱ्याच्या दिवशी ही घटना घडली. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. इरफान इसाक शेख (१७ वर्षे), इम्रान इसाक शेख (१३ वर्षे), ड्रौन हयात पठाण ( ९ वर्षे) आणि व्यंकटेश उर्फ गौरव दत्तू तारक (९ वर्षे) अशी मृत मुलांची नावं आहेत. ही सर्व मुलं लिंबे जळगाव या ठिकाणी राहत होते.

मृत मुलांमध्ये दोन सख्खे भाऊ आणि एक आतेभाऊ असे एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. बुधवारी सकाळी इरफान इसाक शेख हा ट्रॅक्टर धुण्यासाठी जाताना त्यांच्यासोबत त्याचा लहान भाऊ इमरान, मामाचा मुलगा ड्रौन आणि शेजारी राहणारे दत्तू तारक यांचा मुलगा व्यंकटेश उर्फ गौरव हे असे तिघेही ट्रॅक्टरमध्ये बसून गाव शिवारातील मुरूम उत्खनामुळे तयार झालेल्या खदानीत गेले. ट्रॅक्टर धुवत असताना त्यांच्यासोबत भयंकर घडलं आणि खदानीत बुडून त्यांचा मृत्यू झाला.

दीड ते दोन तास झाले तरी मुले परत आली नाहीत. म्हणून मुलांना पाहण्यासाठी ट्रॅक्टर उभे असल्या ठिकाणी कुटुंबातील सदस्य गेले. मात्र तिथे त्यांना कोणीच दिसून आले नाही. त्यांनी त्यांचा शोध घेतला परंतु ते सापडले नाहीत. यावेळी या सर्वांनी शोध घेतला असता एकापाठोपाठ त्यांना तिघांचे मृतदेह हाती लागले तर मोठा इरफान हा तासभर शोध घेतल्यानंतर मिळून आला. तोपर्यंत अनेक जण घटनास्थळी दाखल झाले होते. चारही जणांना बाहेर काढल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या महिलांना मिळणार नाहीत? महत्वाची अपडेट समोर

Film Festival: ११ वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव लवकरच सुरु; 'या' दिवसापासून रंगणार महोत्सव

Eyeliner Tips: परफेक्ट आयलाइनर कसं लावायचं? जाणून घ्या 8 सोप्या स्टेप्स

Maharashtra Live News Update : अजितदादा-लांडगेंच्या वादात; देवेंद्र फडणवीसांकडून महेश लांडगेंची पाठराखण

Parenting Tips: सावधान! तुम्ही तुमच्या लहान मुलांसमोर कपडे बदलता का? वाईट सवय तर लावत नाहीत ना?

SCROLL FOR NEXT