Beze Dam Nashik accident news :  
महाराष्ट्र

Nashik : दिवाळीच्या आनंदात काळाचा घाला! पाहुण्याकडे गेलेल्या बाप-लेकींचा मृत्यू; ऐन सणात ३ जणांचा अंत

Beze Dam Nashik accident news : दिवाळीच्या सुट्टीसाठी नाशिकला पाहुण्यांकडे आलेल्या बाप आणि दोन चिमुकल्या मुलींचा बेझे धरणात बुडून मृत्यू झाला.

Namdeo Kumbhar

Beze Dam Nashik accident news : दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबावर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना नाशिकमध्ये घडली. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी शिवारात बाप आणि २ मुलींचा बुडून मृत्यू झालाय. बेझे धरणात आंघोळीसाठी गेलेल्या वडील आणि त्यांच्या दोन लहान मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून, संपूर्ण अंजनेरी गावावर शोककळा पसरली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, बेझे धरणाच्या लगत उत्तम चव्हाण यांच्याकडे पाहुणे म्हणून आलेले एकाच कुटुंबातील तीन सदस्य धरणाच्या परिसरात फिरण्यासाठी गेले होते. यादरम्यान, पोहण्यासाठी हे तिघेही धरणाच्या पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला.

सुरेश नामदेव भोर (वय ४२ वर्षे - वडील), ज्योती सुरेश भोर (वय १० वर्षे - मुलगी), आणि हर्षदा सुरेश भोर (वय ७ वर्षे - मुलगी) अशी मृतांची नावे आहेत. तिघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पोलिसांनी सरकारी रूग्णालयात पाठवले आहेत. या घटेनची पोलिसांनी नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

दिवाळीत आनंद विरघळला:

सध्या सणासुदीचे दिवस सुरू असताना आणि दिवाळीची सुट्टी असल्याने मुली आपल्या वडिलांसोबत नाशिकला पाहुण्यांकडे आल्या होत्या. बेझे धरणात पोहण्यासाठी बाप-लेकी गेल्या होत्या. मात्र, कोणालाही कल्पना नव्हती की हा त्यांचा शेवटचा दिवस ठरेल. एकाच कुटुंबातील कर्ता पुरूष आणि दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेना युवा सेनेकडून बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तसेच ऊसतोड कामगारांना 20000 किराणा किटचे वाटप

Pune : पुण्यात मध्यरात्री थरार! फटाक्याच्या वादातून तरुणीवर हल्ला; दोघांना अटक

Anna Hazare : मी कधीही पक्षाच्या जवळ गेलो नाही, सोनिया गांधींच्या पुस्तकातील दाव्यावर अण्णा हजारे संतापले

Mobile Phone While Sleeping: रात्री झोपताना मोबाईल उशीजवळ ठेवताय? मग जाणून घ्या त्याचे परिणाम!

Home Hacks : वॉशिंगमशीनमध्ये धुतलेल्या कपड्यांना वास येतोय? मग या 5 जबरदस्त ट्रीक वापरा

SCROLL FOR NEXT