beed News Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : आईची नजर चुकली अन् अनर्थ घडला! खेळता खेळता चॉकलेट खाल्लं, ३ महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू

Beed News : बीडमध्ये तीन महिन्याच्या चिमुकलीच्या घशात चॉकलेट अडकले. तिला ते चॉकलेट गिळता न आल्याने श्वास कोंडून तिचा मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Alisha Khedekar

  • बीडमध्ये तीन महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू

  • खेळता खेळता चॉकलेट तोंडात टाकलं

  • अन्ननलिका छोटी असल्याने गिळू शकली नाही

  • श्वास गुदमरून मृत्यू

डॉक्टर लहान मुलांना चॉकलेट सारख्या पदार्थांपासून लांब ठेवण्याचे सल्ले नेहमी देतात. मात्र बीड मध्ये धक्कादायक घटना उघडकीस आले आहे. एका तीन महिन्याच्या चिमुकलीच्या घशात चॉकलेट अडकून तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेने तिच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मृत चिमुकलीचं नाव आरोही आरोही आनंद खोड असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड तालुक्यातील काटवटवाडी येथील तीन वर्षीय चिमुकली आरोही घरात खेळत असताना जमिनीवर पडलेले चॉकलेट तिने तोंडात टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या वयामुळे ती नीट चावून खाऊ शकली नाही. अचानक चॉकलेट घशात अडकल्याने तिला श्वास घेणेही कठीण झाले. काही क्षणातच तिची प्रकृती गंभीर बनली. कुटुंबीयांनी घाईघाईने तिला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले. परंतु तोपर्यंत तिच्यावर कोणतेही उपाय होण्यापूर्वीच तिचा दुर्दैवी अंत झाला. या अकाली निधनाने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

बाळ जन्मल्यापासून १ ते ७ महिने बाळासाठी आईचे दूध किंवा फॉर्म्युला दूध हा मुख्य आहार असतो. जड जेवण बाळाला खाण्यास अडथळा निर्माण करतात. या कालावधीत बाळांची वाढ होताना अन्ननलिकेचा भाग छोटा असल्याने मोठे कण गिळताना त्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे या कालावधीत आईचं दूध बाळाच्या वाढीसाठी योग्य ठरू शकत.

बाळाच्या ६ ते ७ महिन्यांनंतर ही काळजी घ्या

  • बाळाच्या आहारात कोणतेही अतिरिक्त मीठ किंवा साखर घालू नये.

  • बाळाला एका वेळी एक नवीन पदार्थ द्या

  • बाळाला भूक असेल तितकेच खाऊ घाला

  • बाळाच्या आहारात बदल करत राहा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Tourism : कोल्हापूरमधील छुपा धबधबा, इथं जाताच येईल फॉरेनचा फिल

Viral : पेट्रोल पंपावर दोन गटात तुफान राडा, VIDEO व्हायरल

GST Discount: दसऱ्याला घरी आणा कार; GST कपातीनंतर टाटाच्या या कारवर धमाकेदार डिस्काउंट, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

OBC Reservation: 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला होता, भुजबळ आणि मुंडे OBC साठी मंत्रिपद कधी सोडणार?

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर धावत्या कारला लागली आग

SCROLL FOR NEXT