Traffic Jam Saam TV
महाराष्ट्र

Traffic Jam: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी; नागरिकांचा खोळंबा

Mumbai-Ahmedabad National Highway: महामार्ग वाहतूक पोलीस आणि संबंधित ठेकेदारांच कोणतंही नियोजन नसल्यामुळे ही समस्या रोजची वाढत चालली आहे.

Ruchika Jadhav

Traffic Jam:

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर ते मेंढवन खिंड दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूने सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

सध्या मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सिमेंट काँक्रीटचं काम सुरू आहे. त्यामुळे रोजच वाहतुकदार आणि प्रवाशांना येजा करताना अडचणी निर्माण होतायत. येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांसाठी एकच लेन असल्याने आज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्ग वाहतूक पोलीस आणि संबंधित ठेकेदारांचं कोणतंही नियोजन नसल्यामुळे ही समस्या रोजच वाढत चालली आहे.

सलग ३ दिवासंच्या सुट्ट्यांमुळे गर्दी

अनेक चाकरमान्यांना सलग तीन दिवसांची सुट्टी मिळाली आहे. शनिवार, रविवार आणि अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सुट्टीमुळे अनेक नागरिक घराबाहेर पडलेत. त्यामुळे महामार्गावरील गर्दी आणखी वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप! एकाच झटक्यात २ कोटीहून अधिक मतदार यादीतून बाहेर; ३६ जिल्ह्यातील आकडेवारी पाहा

Maharashtra News Live Update: पंढरपूर कॉरीडोर बाधित लोकांसाठी विशेष पुनर्वसन धोरण मंजूर

Ladki Bahin Yojana : ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये खात्यावर कधी जमा होणार? तारीख आली समोर

Weather Update: मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट! या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा अलर्ट

CNG Price Today : CNG च्या दरात मोठी वाढ, मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा झळ; आजचे ताजे दर काय? वाचा

SCROLL FOR NEXT