NH4 Highway News, Pune Bangalore Highway NH4, Traffic Jam On Pune Bangalore Highway saam tv
महाराष्ट्र

NH4 : राेज मरे त्याला काेण रडे ! पुणे बंगळूर महामार्गावर वाहनांची अडीच किलाेमीटर रांग

हे नित्याचेच झाले असून आम्हांला याची सवय झाल्याचे काही वाहनधारकांनी नमूद केले.

ओंकार कदम

सातारा : तब्बल एक तास झाला पुणे- बंगळूर महामार्गावरील (pune banglore National Highway) वाहतूक (Traffic) धिम्या गतीने सुरु आहे. रस्त्याच्या कामामुळे इंदाेली फाटा येथे वाहतुक ठप्प झाली आहे. दरराेज या रस्त्याने (nh4) येणा-या जाणा-या प्रवाशांना हे नित्याचे झाले असले तर आज या भागात तब्बल दाेन किलाेमीटर अंतरावर वाहनांची (vehicle) रांग लागल्याने वाहन चालक प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करु लागले आहेत. (Pune Bangalore Highway NH4)

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार पुणे-बंगळूर महामार्गावर ठिक ठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच काही ठिकाणी रस्त्याचे काम सुरु आहे. यामुळे अनेकदा या महामार्गावरील वाहतुक ठप्प हाेत असते. हे अनेकांना नित्याचेच झाले आहे.

या महामार्गावरील इंदोली फाटा येथे आज (बुधवार) वाहतूक ठप्प झाली. सुमारे दोन ते अडीच किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या. यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतुक धिम्या गतीने सुरु आहे. या परिसरात रस्त्यांच्या व पुलाच्या कामामुळे वाहतुक खाेळंबत आहे. काही वाहनचालकांनी राेज मरे त्याला काेण रडे अशी देखील भावना व्यक्त केली. (Traffic Jam On Pune Bangalore Highway)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT