महाबळेश्वर (जि. सातारा) : महाबळेश्वर तालुक्यात महाबळेश्वर mahableshwar व पाचगणी panchgani ही दोन पर्यटन स्थळे tourism place आहेत. त्यामुळे इतर तालुक्यांपेक्षा महाबळेश्वर तालुक्याची ओळख वेगळी आहे याचा विचार न करता जिल्हाधिकारी शेखर सिंह shekhar sinh यांनी संपुर्ण जिल्हयात लॉकडाउन lockdown जाहीर करून पर्यटन स्थळांवर अन्याय केला आहे. जिल्हाधिकारी यांनी आपल्या निर्णयाचा फेर विचार करावा यासाठी महाबळेश्वर शहरातील नागरिकांचे एक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना भेटून पर्यटन स्थळांवरील व्यावसायिकांच्या व्यथा मांडण्याचा निर्णय येथील विविध संघटनांच्या प्रतिनिधी व नागरिकांच्या झालेल्या बैठकीत घेतला आहे. (traders-demands-shekhar-sinh-unlock-mahableshwar-satara-trending-news)
संपुर्ण सातारा जिल्हा लाॅकडाउन या जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाने संतप्त झालेल्या महाबळेश्वर शहरातील विविध संघटनांचे प्रतिनिधी व नागरिकांची एक बैठक उपाध्यक्ष अफजल सुतार यांच्या अध्यक्षतेखाली व माजी नगराध्यक्ष डी.एम.बावळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी हॉटेल संघटनेचे अध्यक्ष मनिष तेजाणी, दिलीप जव्हेरी, लहान हॉटेल संघटनेचे अध्यक्ष असिफ सय्यद माजी नगराध्यक्ष किसनसेठ शिंदे, व्यापारी संघटनेचे विशाल तोष्णीवाल, अतुल सलागरे, ॲड. संजय जंगम, नगरसेवक संदीप साळुंखे, सुनिल शिंदे, रविंद्र कुंभारदरे, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष अभिजीत खुरासणे, तौफिक पटवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
महाबळेश्वर शहरातील प्रत्येक घटक हा जिल्हाधिकारी यांच्या कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे कोटेकोर पणे पालन करतो. जिल्ह्यात सर्वात जास्त लसीकरण झालेला तालुका हा महाबळेश्वर आहे. त्याच प्रमाणे महाबळेश्वर तालुक्याने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे तालुक्यात सक्रिय रूग्णांची संख्या सर्वात कमी आहे. त्याच प्रमाणे महाबळेश्वर तालुका हा पर्यटनावर अवलंबुन आहे. त्यामुळे येथील प्रत्येक घटक हा पर्यटकांवर अवलंबुन आहे. अशा परिस्थितीचा कोणताही विचार न करता जिल्हाधिकारी यांनी लॉकडाउन जाहीर करून पर्यटन स्थळास वेठीस धरले आहे.
जिल्हाधिकारी यांनी आपल्या निर्णयाचा फेर विचार करावा या मागणीसाठी येथील विविध संघटनांचे प्रतिनिधी, पत्रकार व नगरसेवक यांचे एक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांची भेट घेवुन त्यांना महाबळेश्वर येथील नागरिकांच्या मागण्यांचे निवेदन सादर करणार आहे. महाबळेश्वर नागरिकांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व आमदार मकरंद पाटील यांनी करावे अशी मागणीही या बैठकीत करण्यात आली.
जिल्हाधिकारी यांनी गुरूवार पर्यंत आपला निर्णय जाहीर करावा अन्यथा शुक्रवार पासुन महाबळेश्वर येथील संपुर्ण बाजारपेठ सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत सुरू करण्यात येईल असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत अफजल सुतार, डी.एम.बावळेकर, अतुल सलागरे, विशाल तोष्णीवाल, ॲड. संजय जंगम, रविंद्र कुंभारदरे, तौफिक पटवेकर, पत्रकार प्रेषित गांधी, राजेंद्र पवार आदींनी मार्गदर्शन केले.
आमदार मकरंद पाटील हे तालुक्याचे 100 टक्के लसीकरण व्हावे यासाठी प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना शहरवासियांचा संपुर्ण पाठींबा असल्याचे या बैठकीत पत्रकार विलास काळे यांनी जाहीर करून महाबळेश्वरचे जे शिष्टमंडळ आहे ते आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालीच काम करणार असल्याचेही या बैठकीत त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.