tuljapur , tuljabhavani mandir, tuljabhavani temple, navratri , navratri festival saam tv
महाराष्ट्र

Tuljabhavani Temple Development Plan : तुळजाभवानी विकास आराखड्यातील 'या' मुद्यावर वादंग, उद्या तुळजापूर बंदची हाक

Tuljapur Bandh Tomorrow : दर्शन मंडपाची जागा बदलल्यास व्यापाऱ्यांचे, स्थानिकांचे नुकासन हाेईल अशी भावना व्यक्त केली जात आहे.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

Tuljapur News : तुळजाभवानी मंदीर विकास प्रारूप आराखड्यातील दर्शन मंडपाच्या जागेवरून वादंग निर्माण झाला आहे. दर्शन मंडप हा घाटशिळ येथे करण्यात पुजारी व व्यापारी व स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. दरम्यान उद्या (ता. 11 ऑक्टोबर) तुळजापुर बंदची हाक देण्यात आली आहे. (Maharashtra News)

नवरात्रोत्सव (Navratri 2023) जवळ आला आहे. संपुर्ण राज्यातून तसेच देश-विदेशातून उत्सव काळात भाविक तुळजापुरला येत असतात. दरम्यान तुळजाभवानी मंदीर विकास प्रारूप आराखड्यातील दर्शन मंडपाच्या जागेवरून वाद सुरु झाला आहे.

घाटशीळ येथे दर्शन मंडप नकाे अशी भूमिका काही पुजारी, व्यापारी, स्थानिकांची आहे. त्यातूनच उद्या (बुधवार) तुळजापूर शहर बंदची हाक देण्यात आली आहे. तुळजाभवानी देवीच्या मुख्य महाद्वार येथे असावा अशी भावना पुजारी आणि व्यापाऱ्यांची आहे.

या अराखड्याचे बुधवारी सायंकाळी पाच वाजता तुळजाभवानी मंदीर संस्थान प्रशासकीय कार्यालयासमोर सादरीकरण होणार आहे. 15 ऑक्टोबरपर्यंत यावर सूचना भाविक, पुजारी, व्यापारी आणि स्थानिक नागरिक यांना करता येतील.

16 व 17 ऑक्टोबरला समक्ष सूचनांवर चर्चा होईल. 20 ऑक्टोबरपर्यंत नागरिक आणि भाविकांनी केलेल्या सुचनांवर तांत्रिक आणि प्रशासकीय विभागाकडून अभिप्राय घेतला जाईल. त्यानंतर 26 ऑक्टोबरपर्यंत जिल्हाधिकारी यांना याबाबतचा अंतिम अहवाल सादर करण्यात येणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घरबसल्या ५ मिनिटांत ट्रान्सफर करा जुन्या कंपनीचा PF; चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळवण्यासाठी फॉलो करा 'ही' एक ट्रिक

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 8व्या वेतन आयोगाबाबत लवकरच मोठा निर्णय होणार, किती असेल फिटमेंट फॅक्टर? वाचा...

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

Health checkups after 40: वयाच्या 40 नंतर शरीरात सुरू होतात हे बदल, डॉक्टरांनी सांगितल्या या 4 टेस्ट करून घ्याच!

Gold Rate Today : गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं ४००० रुपयांनी स्वस्त, वाचा आजचे 18K- 22K आणि 24K चे दर

SCROLL FOR NEXT