Jalgaon: उतार वयात साता जन्माची गाठ, शुभमंगल सावधान...(पहा व्हिडिओ)  Saam Tv
महाराष्ट्र

Jalgaon: उतार वयात साता जन्माची गाठ, शुभमंगल सावधान...(पहा व्हिडिओ)

आयुष्याच्या सरत्या शेवटी वृद्ध काळात खरे तर पती- पत्नींच एकमेकांना आधार असतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जळगाव : लग्न म्हणजे साता जन्माची गाठ, आणि सुखी संसाराची वाट. लग्नानंतर पती- पत्नी हे नाते खऱ्या अर्थाने दृढ होते. आयुष्याच्या सरत्या शेवटी वृद्ध काळात खरे तर पती- पत्नींच एकमेकांना आधार असतात. म्हणूनच यावल तालुक्यामधील किनगाव या ठिकाणील ७५ वर्षीय वृद्ध आणि जामनेर येथील ६६ वर्षीय वृद्धा यांचे शुभमंगल सावधान झाले आहे. उतार वयात देखील दोघांनाही आता एकमेकांचा आधार मिळाला आहे.

पहा व्हिडिओ-

किनगाव येथील रहिवासी आणि जिल्हा परिषद शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक पुंडलिक तायडे यांच्या पत्नी वत्सला तायडे यांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले होते. तायडे यांना २ मुले, ३ मुली, सुना, जावई, नातवंडे आहेत. त्यांची २ मुले नोकरीनिमित्त बाहेरगावी राहत असतात. वडिलांनी आपल्याकडे राहायला यावे, असा मुलांचा आग्रह होता.

मात्र, तायडे यांना गावाची ओढ असल्यामुळे ते किनगाव सोडायला तयार नव्हते. दुसरीकडे जामनेरातील चंद्रभागाबाई सुरळकर यांना देखील वैधव्य आलेले. मूलबाळ नसल्यामुळे त्या एकाकी जीवन जगत होते. या दोघा ज्येष्ठांचा विवाह सोहळा जामनेर मधील संत रोहिदास महाराज मंदिरात पार पडला आहे. या विवाहाला मोजके नातेवाईक उपस्थित होते.

पुंडलिक तायडे आणि चंद्रभागा सुरळकर हे दोघेही वारकरी, दोघेही आपापल्या गावातील वारकऱ्यांसोबत न चुकता मुक्ताईच्या वारीला जात असत. त्याठिकाणी दोघांची ओळख झाली होती. उतार वयात हक्काचा साथीदार असावा, म्हणून दोघांचा विवाहाचा योग जामनेर मधील वारकरी सिंधू सपकाळ यांनी ठेवला. प्रस्तावाला अन्य वारकऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात पाठबळ दिले होते. दोघांनी नातेवाइकांशी चर्चा करून विवाहाचा निर्णय घेतला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : सलमान खानने सदस्यांना दिला मोठा धक्का, बिग बॉसच्या घरात पहिल्या वाईल्ड कार्ड स्पर्धकाची धमाकेदार एन्ट्री

Maharashtra News Live Update: नवरात्र उत्सवानिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये घटस्थापनेला सुरुवात

Heart-Mobile : शर्टच्या खिशात फोन ठेवताय? सावधान! हृदयाचा धोका वेळीच ओळखा, नाहीतर...

Pune : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

CJP Protest: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याशिवाय मागे हटणार नाही, सीजेपीकडून मोठी घोषणा; आज पुन्हा जंतर-मंतरकडे कूच करणार

SCROLL FOR NEXT