Maharashtra Politics  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : शिंदे गटाला मोठा झटका; पक्षातील बड्या महिला नेत्याने साथ सोडली

nashik Politics : एकनाथ शिंदे यांना मोठा झटका बसला आहे. नाशिकमधील बड्या महिला नेत्याने पक्षाची साथ सोडली आहे.

Vishal Gangurde

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

नाशिक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीआधी नाशिकमध्ये शिंदे गटाला मोठा झटका बसला आहे. सहा टर्म नगरसेवक राहिलेल्या डॉ. हेमलता पाटील या दोन महिन्यातच शिंदे गटाची साथ सोडणार आहेत. त्यांनी दोन महिन्यापूर्वी काँग्रेसमधून शिंदे गटात प्रवेश केला होता. त्याच डॉ. हेमलता पाटील यांनी शिंदे गटाची साथ सोडली आहे.

काँग्रेसमधून शिंदे गटात गेलेल्या हेमलता पाटील यांनी पुन्हा पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षात राहून पक्षाला न्याय देऊ शकत नाही, असं म्हणत हेमलता पाटील यांनी माहिती दिली. हेमलता यांनी फेसबुकवर व्हिडिओ शेअर करत माहिती दिली. विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमधून शिवसेनेत हेमलता पाटील यांनी प्रवेश केला होता.

30 ते 35 वर्ष काँग्रेसमध्ये काम केल्यानंतर विधानसभा निवडणुकीत पक्षाने उमेदवारी नाकारल्याने हेमलता पाटील नाराज होत्या. याच नाराजीनंतर त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेसची साथ सोडताना हेमलता पाटील यांना अश्रू अनावर झाले होते. सध्या कुठल्याही पक्षात प्रवेश न करता सामाजिक संघटनेच्या माध्यमातून काम करत राहणार असल्याची माहिती हेमलता पाटील यांनी दिली.

कोल्हापुरात ठाकरे गटाला धक्का

कोल्हापुरात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी बंडखोरी करत महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांना पाठिंबा दिला होता. त्यांच्या पाठिंब्यामुळे मुश्रीफांचा विजय सोपा झाला . त्याचेच फळ म्हणून जिल्हा बँकेत संजय बाबा घाटगे यांना संचालक मंडळात स्थान देण्यात आलं. आता त्यांनी थेट उद्धव ठाकरेंची साथ सोडत भाजपचे कमळ हाती घेतलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : फिनालेच्या शर्यतीतून 'हा' स्पर्धक OUT, मास्टर माइंडचा खेळ संपला | VIDEO

SCROLL FOR NEXT