मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम-हलगेकर आज तुतारी फुंकणार आहे. त्यामुळे एक प्रकारे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा झटका असल्याचे बोलले जात आहे. आज अहेरी येथे शिवस्वराज यात्रेनिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, माजी मंत्री अनिल देशमुख उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत भाग्यश्री आत्राम यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. त्यामुळे अहेरी विधानसभा क्षेत्रात वडील विरुद्ध कन्या अशी लढत आता निश्चित मानली जात आहे.
बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत आजपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहेत. बार्शीतील शिवसृष्टी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन सुरु झालं आहे . मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं यासाठी आंदोलन सुरू आहे.
जोपर्यंत विशेष अधिवेशन बोलावलं जाणार नाही तोपर्यंत दररोज 10 ते 6 आंदोलन सुरु ठेवणार असल्याची राऊत यांनी सांगितलं. त्यामुळे राज्य सरकार या बेमुदत ठिय्या आंदोलनाची दखल घेत का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक महत्वाचा निर्णय घेणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली.
मुंबईत रखडलेले १२० पुर्नविकास प्रकल्प मार्गी लावण्याचा प्लान शिंदेंनी आखला आहे. त्यानुसार २ लाखाहून अधिक कुटुंबियांना त्यांना त्यांचे हक्काचे घर मिळण्यास मदत होणार आहे. या १२० प्रकल्पातील ६० प्रकल्प हे पालिकेचे असल्याची सूत्रांनी माहिती दिली. हे रखडलेले प्रकल्प सिडको, एमएमआरडीए, म्हाडा, एमआयडीसी, महाप्रित आणि पालिकेतर्फे यामार्फत मार्गी लावण्याचा मानस आहे.
एसटी बसेसच्या ताफ्यात आणखी १०० बसेस येणार आहेत. अशोक लेलँडच्या साध्या डिझेलवर धावणाऱ्या बस दाखल होणार आहेत. ऑक्टोबरमध्ये साधारण १०० बस ताफ्यात दाखल होणार आहेत. हजारो बस नादुरुस्त असून त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याने निर्णय घेण्यात आलाय. भाडेतत्त्वावर नव्या १,३१० बस घेण्यासाठी निविदा प्रसिद्ध.राज्यभरातील अनेक जिल्हात निविद भरण्याचे आवाहन महामंडळाने केले आहे.
मनोज जरांगे पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाबद्दल राहुल गांधींना प्रश्न विचारणार का? असा सवाल आमदार प्रसाद लाड यांनी उपस्थित केलाय. राहुल गांधी येणाऱ्या काळात आरक्षण संपवणार असतील, तर मनोज जरांगे पाटील हे म्हणतील का? की राहुल गांधी देखील देवेंद्र फडणवीस यांचाच माणूस आहे? लोकसभा निवडणुकीत नरेटिव्ह सेट करणाऱ्या काँग्रेसची खरी आणि संविधान विरोधी भूमिका राहुल गांधींच्या तोंडून आता समोर आली आहे, असे प्रसाद लाड म्हणाले.
मढ-वर्सोवा पूल प्रकणावर बीएमसीचे स्पष्टीकरण
मुंबई उपनगरातील मालाड (पश्चिम) येथील मढ बेट येथील रहीवाशांना अंधेरी येथे जाण्याकरिता अंदाजे १८.६ किमीचे अंतर पार करावे लागते ज्यास साधारणतः १.३० तासाचा कालावधी लागत असल्याने मढ बेट येथील रहिवाशी व लोकप्रतिनिधी यांस कडून मढ व वर्सोवा मधील वर्सोवा खाडीवर पूल बांधण्याकरिता वांरवार मागणी होत होती. सदर ठिकाणी मढ जेट्टी-वर्सोवा येथील वर्सोवा खाडीवरील प्रस्तावित पुलाच्या बांधकामामुळे प्रवासाची लांबी १८.६ किमीवरुन ५ किमीपर्यंत कमी होण्यास मदत होईल आणि प्रवासाचा वेळ १ तास ३० मिनिटावरुन २० मिनिटापर्यंत कमी होईल. ज्यामुळे इंधन व वेळेची बचत होईल तसेच पर्यावरणाची हानी कमी करण्यास मदत होईल. मढ-वर्सोवा पूल बांधणीच्या खर्चवाढीबाबतची बातमी काही वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाली आहे. तसेच मढ-वर्सोवा पूल बांधणीच्या निर्मितीचे काम हे संथ गतीने होत असल्याने खर्च वाढत असल्याचे आरोपही या बातम्यांमधून करण्यात आले आहेत. यादृष्टीने, जनमानसामध्ये गैरसमज पसरु नयेत, याकरीता सदर प्रकाशित बातम्यांबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून पुढीलप्रमाणे वस्तुस्थितीदर्शक सविस्तर स्पष्टीकरण करण्यात येत आहे.
बर्थडे पार्टीसाठी गेलेल्या लहान मुलांना देण्यात आलेल्या सीलबंद ऑरेंज ज्यूसच्या बाटलीत डास आढळून आल्यामुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. 9 सप्टेंबर रोजी जोगेश्वरी पश्चिमेकडील आदर्श नगर येथे वाढदिवसाची पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत आलेल्या लहान मुलांना आयोजकांकडून बिग किड्स ऑरेंज हे पेय देण्यात आले. वैष्णवी कसाळकर नावाच्या मुलीच्या हातात आलेल्या ज्यूसच्या सीलबंद बाटलीमध्ये काहीतरी संशयास्पद दिसून आले. तिने आपल्या आई-वडिलांना ती ज्यूसची बाटली दाखवली असता त्यात डास आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली.
अंबरनाथच्या मेडिकल कॉलेजला अखेर हक्काची इमारत मिळाली!
अंबरनाथ शहरात शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या मेडिकल कॉलेजसाठी पालिका प्रशासनाने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी उभारलेली पाच मजली इमारत मेडिकल कॉलेजकडे वर्ग केली आहे. जोपर्यंत मेडिकल कॉलेजचं बांधकाम पूर्ण होत नाही, तोपर्यंत पालिकेच्या इमारतीमधून मेडिकल कॉलेजचा कारभार चालणार आहे.
बीड - डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू, नातेवाईकाचा आरोप
बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत, नातेवाईकांनी महिलेचा मृतदेह जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दालनात आणून ठेवला. तब्बल 2 तास या ठिकाणी हा गोंधळ सुरू होता. रेखा गायकवाड असं मृत महिलेचे नाव असून विषारी द्रव प्राशन केल्याने महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. याच दरम्यान केवळ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. दरम्यान जोपर्यंत संबंधित डॉक्टरांच निलंबन केलं जात नाही, तोपर्यंत या ठिकाणाहून मृतदेह हलविला जाणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. मात्र कारवाईच्या आश्वासनानंतर नातेवाईकांनी सदरील महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला.
चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरांचा सुळसुळाट
चतुर्शिंगी परिसरात चोरांनी धुमाकूळ घातला आहे. दुकानात चोरी करतानाचा हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय. चोऱ्या रोखण्याचा सोडुन चतुर्शिंगी पोलिसांचे भलतच उद्योग सुरू आहेत.औंध रोड परिसरातील घटना आहे. चोरट्यांचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय चोरट्याने दुकानातील साहित्य देखील यावेळी चोरून नेले. चतुर्श्रुंगी पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. पोलीस व्यावसायिकांनाच मारहाण करतात. सर्वात जास्त खुनाचे प्रयत्नही झोन चारच्या हद्दीत झाले आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.