Top 10 Marathi News Headlines top 10 headlines
महाराष्ट्र

Top 10 Headlines: माजी गृहराज्यमंत्र्याची शिवीगाळ, नागपूरच्या सरकारी रुग्णालयातील औषधे बनावट; वाचा टॉप १० हेडलाइन्स

Today's Top 10 Marathi News Headlines: महाराष्ट्रासह देशातील महत्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा

Namdeo Kumbhar

तुळजापूरात'आई राजा उदो उदो' चा जयघोष,भवानी ज्योत नेण्यासाठी राज्यभरातून गर्दी

तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवा निमित्त आई राजा उदो उदो च्या जयघोषात तुळजाभवानी मातेच्या दरबारातुन भवानी ज्योत नेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून नवरात्र महोत्सव मंडळाचे कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.तुळजाभवानी मातेच्या दरबारातुन भवानी ज्योत प्रज्वलित करुन ती अनवाणी पायांनी पायी चालत नेण्यासाठी प्रथा आहे.त्यामुळे तुळजापूरात नवरात्र महोत्सव मंडळाचे कार्यकर्ते मोठी गर्दी करताना पाहायला मिळत आहे.उद्या तुळजाभवानी माता सिंहासनावर विराजमान होणार असुन दुपारी 12 वाजता घटस्थापना होणार आहे तर घटस्थापना झाल्यानंतर नवरात्र महोत्सवाला प्रारंभ होणार आहे त्यामुळे भवानी ज्योत घेवुन जावुन गावोगावी देवीची स्थापना केली जाते त्यासाठी तुळजापूरात भाविक व नवरात्र मंडळाचे कार्यकर्ते गर्दी करताना पहायला मिळत आहेत.

नारळ फोडण्यास व तेल विक्री करण्यास बंदी

तुळजाभवानी मंदीर व परीसरात सोललेले नारळ फोडण्यास व तेल विक्री करण्यास बंदी घालण्यात आली. 3 ते 18 ऑक्टोबर दरम्यान शारदीय नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत सुरक्षिततेसाठी मंदीराच्या 200 मिटर परीसरात बंदी घालण्यात आली.

तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने निर्णय घेण्यात आला. मंदीर संस्थांनच्या तहसीलदार तथा व्यवस्थापक यांनी प्रसिध्दी पत्रक जारी केलेय.

नागपूरच्या सरकारी रुग्णालयातील औषधे बनावट

नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तथा रुग्णायात देण्यात आलेली औषधी बनावट, अन्न प्रशासन विभागाच्या तपासणी उघड झालेय. रिक्ल्यव्ह 625 अस अँटिबायोटिक औषधाचे नाव आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत 77 हजार पेक्षा जास्त औषध गोळ्यांचं रुग्णांना वाटप करण्यात आलेय. ऑगस्ट 2023 मध्ये एफडीए कडून रिप्लाय 625 औषधींचे 200 नमुने तपासणीसाठी पाठवले होते. यात अहवालात हे औषध बनावट असल्याचं तसेच उत्तरांचल कंपनीचा नाव असून ती अस्तित्वात नसल्याचं समोर येत आहे. गव्हर्नमेंटच्या ई मार्केट प्लेस या नॅशनल पब्लिक प्रोक्योरमेन्ट पोर्टलवरून औषधी विकत घेण्यात आली. त्यामुळे यात मोठे गोड बंगाल असण्याची शक्यता आहे. अन्न व औषधी प्रशासन विभागाकडून या संदर्भात पोलिसात तक्रार केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

अजित पवारांना "मुख्यमंत्री" करण्यासाठी "आमदार" व्हायचं...

शिरुर हवेली मतदारसंघात शरद पवार गटाचे आमदार अशोक पवारांना आवाहन देण्यासाठी अजित पवारांचा शिलेदार शांताराम कटके मैदानात उतरले आहेत. अशोक पवार शिरुरमधून निवडूनच कसा येतो? तेच पाहतो असं विधान अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेतून केलं होत. त्यावेळी शरद पवारांनी अशोक पवारांना मंत्री करण्याचे आश्वासन दिलंय. आता काहींना मंत्रीपदाची स्वप्न पडायला लागली, मात्र अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी मला आमदार व्हायचे अशी हटके प्रतिक्रिया अजित पवारांचे शिलेदार शांताराम कटके यांनी दिली आहे. त्यामुळे शिरुर - हवेली विधानसभा मतदार संघाचे राजकारण पाडा पाडीच होणार का हे पाहावे लागणार आहे.

माजी गृहराज्यमंत्र्याची बिडीओला अर्वाच्या भाषेत शिवीगाळ करत दमदाटी

अक्कलकोटचे काँग्रेसचे माजी आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी पंचायत समितीच्या बिडीओला अर्वाच्या भाषेत शिवीगाळ करत दमदाटी केली. पंचायत समितीला जाळ लावून बिडीओ तुम्हाला आत टाकेन अशा भाषेत दमदाटी केली .

पंचायत समिती ऑफिस जाळून टाकेल, माझं पोलीस किंवा कोणीही ××××× वाकडं करू शकत नाही अशा भाषेत दमदाटी केली.

हे पंचायत समिती कार्यालय मीच बांधले आहे त्यामुळे हे जळायला मला फार वेळ लागणार नाही. या ऑफिसला जाळ लावून तुम्हाला आम्ही आत टाकतो मग काय करणार तुम्ही?

सचिन तेंडुलकर नागपुरात दाखल

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर नागपुरात दाखल झालाय. ताडोबा जंगल सफारीसाठी सचिन तेंडुलकर हे आज नगपूरता दाखल झाले. सचिन तेंडुलकर यांना जंगल सफारीची आवड आहे. ते नियमितपणे विदर्भात जंगल सफारीसाठी येत असतात. विशेष म्हणजे मागील काही दिवससंपासून बंद असलेली जंगल सफारी 1 ऑक्टोबर पासून पुन्हा सुरु झाली. तेच दोन आक्टोंबरला सचिन तेंडुलकर हे जंगल सफारीसाठी नागपुरात दाखल झाले आहे.

जुनी पेन्शन योजना लागू -

'त्या' जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी निर्णय घेतलाय. १ नोव्हेंबर २०१५पूर्वी जाहिरात काढलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना दिलासा मिळालाय. २०१५ मध्ये जाहिरात व नंतर कामावर रुजू झालेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आला. राज्य शासकीय कर्मचाऱ्यानंतर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनाही जुनी पेन्शन लागू करण्यात आलाय.

माढ्यातून उमेदवारी तिढा; शिवतेज मोहिते पाटील यांच्या उमेदवारीची मागणी

माढा विधानसभा मतदारसंघातून शरदचंद्र पवार पक्षाकडून अनेक जण इच्छुक आहेत. काल संजय कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मेळाव्यात उमेदवारीची मागणी केली आहे. त्यानंतर आज माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे शिवतेज मोहिते पाटील यांना ही माढ्यातून उमेदवारी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राम मस्के यांनी केली आहे. मस्के यांच्या मागणी नंतर आता माढ्यात उमेदवारीचा तिढा निर्माण झाला आहे.

पुण्यात हेलिकॉप्टर कोसळले, ३ जणांचा मृत्यू

पुण्यातील बावधन बुद्रुक गावाच्या परिसरात सकाळी हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमध्ये असणारे दोन वैमानिक आणि एका अभियंत्याचा जागीच मृत्यू झाला. हेलिकॉप्टर डोंगराळ भागातून जात असताना मोठ्याप्रमाणावर धुके होते. त्याचा अंदाज न आल्याने हेलिकॉप्टर कोसळले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. हेलिकॉप्टर दरीत कोसळल्यानंतर इंजिनाने लगेच पेट घेतला. त्यामुळे स्फोट होऊन हेलिकॉप्टरचे तुकडे झाले. त्यामुळे आतमध्ये असणारे वैमानिक आणि अभियंत्याचा मृतदेह छिन्नविछिन्न झाला होता. हेरिटेज एव्हिएशन कंपनीचे हेलिकॉप्टर मुंबईतील जुहूच्या दिशेने निघाले होते. अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर मुंबईत येणार होते. मात्र, त्यापूर्वीच अपघात घडला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

Maharashtra News Live Updates: महायुतीची आज कोल्हापूरमध्ये मोठी प्रचार सभा

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

VIDEO : आम्हाला त्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, राज ठाकरेंच्या 'त्या' विधानावर राऊतांची प्रतिक्रिया | Marathi News

Sangli Politics: लोकसभेप्रमाणे विधानसभेतही बंडखोरीचा पॅटर्न; सांगलीत काँग्रेस खासदाराची अपक्ष उमेदवाराला साथ

SCROLL FOR NEXT