Maharashtra Winter Update News Saam Tv
महाराष्ट्र

Today Winter Temprature : राज्यात थंडी ओसरली! कमाल तापमानात वाढ; कसं असेल आजच हवामान?

Maharashtra Winter Update News : राज्यात थंडीचा कडाका ओसरला असून निफाड आणि धुळ्यात किमान तापमान ६ अंशांच्या खाली गेले आहे. मात्र पुढील दोन दिवस तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Alisha Khedekar

  • राज्यात कमाल तापमानात वाढ

  • निफाड आणि धुळ्यात पारा ६ अंशाच्या खाली

  • हवामान विभागाने पुढील दोन दिवस तापमान घटण्याचा अंदाज व्यक्त केला

  • तापमानातील चढ-उतारांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता

राज्यात थंडीची लाट ओसरली आहे. पुढील काही दिवस राज्याच्या किमान तापमानातील घट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज राज्यात कमाल तापमानातील चढ-उतार सुरूच राहणार असून निफाड आणि धुळ्यात तापमानाचा पारा ६ अंश सेल्सियसच्या खाली गेला आहे. वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलांमुळे नागरिक देखील हैराण झाले आहेत.

काल म्हणजेच सोमवारी निफाड येथे ५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळ्यात ५.८ अंश सेल्सिअस, परभणीत ६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अहिल्यानगर आणि गोंदिया येथे पारा ८ अंशाच्या खाली आहे. पुणे, मालेगाव, गोंदिया येथे ९ अंशांपेक्षा कमी, जळगाव, ‎‎‎‎नाशिक, ‎नागपूर, ‎यवतमाळ येथे १० अंशापेक्षा कमी तापमानाची नोंद झाली.

आज तापमानात चढ उतार होत असून राज्यातील थंडीची लाट काहीशी ओसरणार असल्याची शक्यता हवामान विभागाने दिला आहे. असे असले तरी काही प्रमाणात थंडीचा कडाका कायम राहणार आहे. पुढील दोन दिवस काही ठिकाणी किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याचा अंदाज आहे.

कोणत्या जिल्ह्यात कसं असेल हवामान ?

  • अहिल्यानगर: ७.३

  • पुणे: ८.६

  • जळगाव: ९.५

  • कोल्हापूर: १५.३

  • महाबळेश्वर: १२.१

  • मालेगाव: ८.४

  • नाशिक: ८.८

  • सांगली: १३.०

  • सातारा: ११.२

  • सोलापूर: १४.१

  • छत्रपती संभाजीनगर: १०.५

  • परभणी: १०.६

  • अकोला: १०.९

  • अमरावती: १०.८

  • बुलढाणा: १२.६

  • गोंदिया: ८.४

  • नागपूर: ९.२

  • वर्धा: ११.४

  • यवतमाळ: ९.६

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणूक प्रशासनाची घरावर धाड; शिंदे गटाच्या बड्या नेत्याला हृदयविकाराचा झटका

Tuesday Horoscope : तुमचा जवळचा मित्र विश्वासघात करण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना जपून निर्णय घ्यावा लागेल

दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटीक्स; शिंदेंचा ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल|VIDEO

CM फडणवीसांकडून 'लाव रे तो व्हिडिओ' पॅटर्न; शिवतीर्थावरून ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल, VIDEO

मलाईवरुन मुंबई तापली, मुंबईत येतो, पाय छाटून दाखवा

SCROLL FOR NEXT