Maharashtra Weather Update News Saam Tv
महाराष्ट्र

Rain Alert : राज्यावर पावसाचं सावट! गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांवर संकट; वाचा तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather Update News : राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने आजही ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Alisha Khedekar

  • उत्तर महाराष्ट्रात गारपीटीसह अवकाळी पाऊस

  • धुळे, जळगाव जिल्ह्यांत पिकांचे मोठे नुकसान

  • राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण

  • शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी

राज्याच्या हवामानात गेले काही दिवसांपासून चढ उतार पाहायला मिळत आहेत. आज ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारपिटीने तडाखा दिला आहे. या हवामानाचा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे.

मंगळवारी २७ जानेवारी रोजी पावसाने अनेक भागांत हजेरी लावली. तर बऱ्याच ठिकाणी गारपीटांचा पाऊस देखील झाला. हवामान विभागाने राज्यातील ७ जिल्ह्यांना काल यलो अलर्ट जारी केला होता. सायंकाळनंतर धुळे, जळगाव जिल्ह्यांत अनेक भागांत पावसाने हजेरी लावली.

धुळ्यातील शिरपूरच्या पूर्व भागात १० ते १२ मिनिटे गारपीट झाली. यामुळे थाळनेर, सावेर आदी गावांत मोठी हानी झाली. दरम्यान आज राज्यातील वातावरण ढगाळ स्वरूपाचे आहे. पहाटे अनेक ठिकाणी दाट धुक्यासह मोठ्या प्रमाणात दव पडल्याचे दिसून आले.

तसेच हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. काढणीला आलेल्या पिकांना अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे शेतकऱ्यावर मोठं संकट ओढवलं आहे. शेतकऱ्यांनी या नुकसानाची भरपाई मागण्यासाठी जोर धरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अजित पवार यांचे पी एस ओ विदीप जाधव यांच्यावर त्यांच्या मूळ गावी होणार अंत्यसंस्कार

Kitchen Hacks : एअर फ्रायर कसा साफ करावा? जाणून घ्या 'या' सोप्या टिप्स

Ajit Pawar Funeral Baramati Live Updates : शरद पवार काटेवाडी येथे अजित पवारांच्या निवासस्थानी पोहचले

Gaurav Khanna : "दिल हमेशा कुर्बान होता है..."; बिग बॉस विजेता गौरव खन्ना अन् आकांक्षा चमोला यांचा 9 वर्षांचा संसार मोडला?

Ajit Pawar funeral: अजितदादा परत या...कार्यकर्त्यांचा बारामतीत हंबरडा, जनसागर लोटला, डोळ्यात अश्रूंच्या धारा!

SCROLL FOR NEXT