धुळ्यात १६ लाखांहून अधिकचा गुटखा व पानमसाला जप्त भूषण अहिरे
महाराष्ट्र

धुळ्यात १६ लाखांहून अधिकचा गुटखा व पानमसाला जप्त

पथकाने संशयित बोलेरो वाहनाची तपासणी केली असता त्यात राज्यामध्ये बंदी असलेला गुटखा व पानमसाला मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण अहिरे

धुळे -  साक्री Sakri तालुक्यातील निजामपूर गावात आदर्श विद्या मंदिरAdarsh Vidhya Mandir समोरील वानखेडे रोडवर अज्ञात बोलेरो वाहन संशयास्पद आढळून आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली होती. यावरून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने तात्काळ साक्री तालुक्यातील निजामपूर Nizampur या ठिकाणी पथक रवाना केले. या पथकाने संशयित बोलेरो वाहनाची तपासणी केली असता त्यात राज्यामध्ये बंदी असलेला गुटखा Tobacco व पानमसाला मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे.Tobacco worth Rs 16 lakh seized in Dhule

हे देखील पहा -

या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तब्बल सोळा लाखांहून अधिकचा गुटखा व पानमसाला जप्त केला आहे. तसेच बोलेरो वाहनासह या कारवाई दरम्यान 20 लाखांहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याच बरोबर एका आरोपीच्या देखील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाई दरम्यान आढळून आलेला गुटका व त्याचबरोबर बोलेरो वाहनासह वीस लाखांहून अधिकचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातर्फे करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cornflakes Chivda: शाळेत सुका खाऊ देण्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत स्वादिष्ट मक्याचा चिवडा, वाचा रेसिपी

रक्तातील साखर वाढणार नाही! फक्त या 3 भाज्या खा

पगडीने तोंड दाबलं, हाताची नस कापली, गळा दाबून 7 वर्षांच्या निरागस मुलाची हत्या, भद्रकालीच्या जंगलात नेमकं काय घडलं?

उद्धव ठाकरेंना पुन्हा हादरा, आता १४ आमदार फुटणार? शिंदेंच्या आमदाराच्या दाव्याने खळबळ

Black Rain : 'काळा पाऊस' कोसळला; नागरिक हबकले, मॉस्कोमधील व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT