Devendra Fadnavis on Tiger Shroff Firing  
महाराष्ट्र

Tiger Shroff Firing : ‘आकाला देशाबाहेरून शोधून काढणार!’ टायगरवर गोळीबार करणाऱ्यांना फडणवीसांचा थेट आणि कडक इशारा

Devendra Fadnavis on Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार झाल्याच्या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरोपींचे धागेदोरे पोलिसांना मिळाल्याचे सांगत, गोळीबार करणाऱ्यांसह त्यांना मदत करणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

Namdeo Kumbhar

Tiger Shroff Firing Latest News : बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या गंभीर घटनेनंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेत गुन्हेगारांना आणि संबंधित गँगना थेट इशारा दिला आहे. "कोणतीही गँग असो किंवा व्यक्ती असो, कुणालाही सोडले जाणार नाही," अशा शब्दांत त्यांनी समाचार घेत पोलीस प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली आहे.

नेमकी घटना काय?

रविवारी रात्री अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर अज्ञात हल्लेखोरांनी जोरदार गोळीबार केला. या हल्ल्यात तब्बल १० राऊंड फायर करण्यात आले होते. या धक्कादायक घटनेमुळे बॉलिवूडसह संपूर्ण सुरक्षा यंत्रणेत खाडकन खळबळ उडाली. याआधीच टायगर श्रॉफला सुरक्षा पुरवण्यात आली होती, तरीही हा हल्ला झाल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे

या घटनेवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "घटना अत्यंत गंभीर आणि निंदनीय आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींचे मुख्य धागेदोरे आणि ओळख पटवली आहे. आरोपी अल्पवयीन आहेत किंवा नाही, हे अद्याप सांगता येणार नाही, परंतु पोलिसांना तपासाचे ठोस धागेदोरे सापडले आहेत. त्या आधारावर पोलिसांचे वेगाने काम सुरू असून लवकरच आरोपींना बेड्या ठोकल्या जातील."

"हे सर्व डरपोक लोक, भाडोत्री गुन्हेगारांचा वापर"

गुन्हेगारांवर कडक शब्दात ताशेरे ओढत फडणवीस म्हणाले की, "ही गँग अत्यंत डरपोक आणि घाबरट आहे. ते स्वतः लपून बसतात आणि कम्युनिकेशनच्या माध्यमातून गुन्हे घडवून आणतात. किरकोळ आणि भाडोत्री लोकांवर हे काम सोपवले जाते. हे लोक महाराष्ट्र किंवा देशाबाहेरून राहून हा सर्व कारभार ऑपरेट करत आहेत. मात्र, केंद्र सरकारच्या मदतीने त्यांच्या ‘आकाला’ (मुख्य सूत्रधारांना) शोधून काढले जाईल. अशा गँगना घाबरण्याचे अजिबात कारण नाही. मुंबई पोलीस अत्यंत प्रोफेशनल असून ते अशा गुन्हेगारांना योग्य तो धडा शिकवतील."

विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर

या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर ताशेरे ओढले होते, ज्याला फडणवीसांनी जशास तसे उत्तर दिले. विरोधकांच्या टीकेचा समाचार घेताना ते म्हणाले, "या आधीच्या काळात काय झाले हे जनतेने पाहिले आहे. मनसुख हिरेनचा मृत्यू झाला, मंत्र्यांना तुरुंगात जावे लागले आणि त्यांच्याच राजवटीत त्यांचे पोलीस अधिकारी स्वतः उद्योगपतींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी (बॉम्ब) ठेवत होते. त्यावेळी उद्योगपती सुरक्षित नव्हते. मात्र, आमचे सरकार अशा प्रकरणांमध्ये कसलीही हयगय करणार नाही."

ऑपरेशन करून गँग नेस्तनाबूत करणार

फडणवीसांनी स्पष्ट केले की, लॉरेन्स बिश्नोई असो वा इतर कोणतीही गँग, यासंदर्भातील कारवाईसाठी सरकारने आधीच कठोर पावले उचलली आहेत. या गुन्हेगारी नेटवर्कला मुळापासून संपवण्यासाठी विशेष मोहीम (ऑपरेशन) राबवून सर्व गँग नेस्तनाबूत करण्याचे काम सरकार करेल. प्रत्येक धमकीवर योग्य ती कठोर कारवाई केली जात असून मुंबई पोलीस गुन्हेगारांसमोर कधीही झुकणार नाहीत, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff : "तिथे रक्ताचे डाग दिसले..."; टायगर श्रॉफवर गोळीबार झाला तेव्हा नेमकं काय घडलं? प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला थरार

Gold Rate : दसऱ्याआधी सोन्याच्या दरात वाढ! नवमीला सोन्याचे भाव वधारले; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर

Sleeping : रात्री झोपेत अचानक श्वास कोंडल्यासारखे होऊन जाग येते? शरीर देतेय 'या' गंभीर आजाराचे संकेत

Amla Powder And Turmeric Benefits For Cold And Caugh: सर्दी आणि खोकल्यावर करा आवळा पावडर आणि हळदीचा सोपा उपाय, कोमट पाण्यात एकत्र करून पिण्याचे आरोग्यदायी फायदे

Maharashtra News Live Update: अहिल्यानगरच्या श्रीगोंदा शहरात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या 27 वर्षीय विद्यार्थिनीने घेतला गळफास

SCROLL FOR NEXT