ताडोबा जंगलातील थरार; पर्यटकांसमोर वाघिणीने घेतला महिला वनरक्षकाचा बळी Saam Tv
महाराष्ट्र

ताडोबा जंगलातील थरार; पर्यटकांसमोर वाघिणीने घेतला महिला वनरक्षकाचा बळी

ही थरारक घटना शनिवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास कोलारा वनपरिक्षेत्रात गेटपासून ४ कि.मी. अंतरावर घडली आहे. विशेष म्हणजे, पर्यटकांच्या डोळ्यांसमोरच हा धक्कादायक थरार घडला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये कर्तव्य बजावत असताना स्वाती ढुमणे (वय- ३८) या महिला वनरक्षकावर माया वाघिणीने हल्ला चढवून जागीच ठार केले आहे. ही थरारक घटना शनिवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास कोलारा वनपरिक्षेत्रात गेटपासून ४ कि.मी. अंतरावर घडली आहे. विशेष म्हणजे, पर्यटकांच्या डोळ्यांसमोरच हा धक्कादायक थरार घडला आहे. ताडोबात वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर पहिल्यांदाच वाघाचा असा हल्ला झाला आहे.

हे देखील पहा-

स्वाती ढुमणे ही ३ वनमजुरांसह त्यावेळेस जंगलात वाघांचे चिन्ह सर्वेक्षण करत होते. कक्ष क्रमांक ९७ मध्ये सुमारे २०० मीटरवर त्यांना माया वाघीण आढळून आली होती. वाघिणीला पाहून त्यांनी आपला मार्ग बदलला होता. मात्र, काही वेळामधेच अचानक वाघिणीने स्वाती यांच्यावर हल्ला चढविला आणि जंगलात फरपटत नेले आहे. ही घटनेची माहिती कळताच वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून शोध घेतला असता, स्वाती यांचा मृतदेहच आढळून आला आहे.

या घटनेमुळे लगेच सर्व्हे थांबविण्यात आला, अशी माहिती व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डाॅ. जितेंद्र रामगावकर यांनी यावेळी दिली आहे. वनविभागाच्या वतीने पती संदीप सोनकांबळे यांना ५ लाख १० हजारांची तातडीची मदत देण्यात येणार आहे. त्यांना ४ वर्षांची आरुषी नावाची मुलगी आहे. स्वाती ताडोबातील पहिल्या वन शहीद ठरले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: आता विधवांना संबोधलं जाईल 'एकल महिला', महाराष्ट्र सरकारची नवी योजना

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

SCROLL FOR NEXT