Sangli, Warkari, Satara, Solapur, Injured, Police saam tv
महाराष्ट्र

Warkari : वारकऱ्यांच्या दिंडीत माहूलीतील कार घुसली; तिघे जखमी, साता-याच्या वाहन चालकावर गुन्हा दाखल

पोलिस घटनेचा कसून तपास करीत आहेत.

विजय पाटील

Sangli News : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे मंगळवारी सायंकाळी पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या दिंडीला पाठीमागून एका चार चाकीने टक्कर दिल्याने तीन वारकरी जखमी झाले. या घटनेच्या वेळेस समोरून येणाऱ्या दुचाकीला चुकवण्याच्या प्रयत्नात कारचालकाचा अंदाज चुकल्याने ही दुर्घटना घडली अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. (Sangli Latest Marathi News)

या घटनेत भीमराव पांडुरंग जाधव, धनाजी राजाराम मोहिते आणि शिवाजी मारुती मोहिते हे तिघे जण जखमी झाले आहेत. या सर्वांना पुढील उपचारासाठी सांगली येथील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. (Breaking Marathi News)

हे सर्वजण मोहिते वडगाव तालुका कडेगाव येथील आहेत. अपघातग्रस्त वाहन हे माहुली येथील आहे. ते सोलापूरला (solapur) जात होते. वाहन चालक भानुदास थोरात हे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील आहेत. आटपाडी पोलिसांनी (police) घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. या अपघाताची नाेंद पोलीस ठाण्यात झाली आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केस लवकर वाढवण्यासाठी सकाळी की रात्री तेल कधी लावावे? योग्य वेळ काय?

Maharashtra News Live Update: पुण्यात भर पावसात काँग्रेसचं आंदोलन

Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाआधी लाडक्या बहिणींना मोठा धक्का! ₹1,500 अचानक बंद? सरकारकडून स्पष्टीकरण

High Blood Pressure : हाय बीपीच्या रुग्णांसाठी कोणती भाजी, फळ अन् पीठ सुपरहेल्दी?

CJP Protest: सत्ताधाऱ्यांमध्ये कुणी पाकिस्तानी आहे का? उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला खोचक टोला

SCROLL FOR NEXT