अशकान काझी, श्रेया गडाख, किरण चोरमले. 
महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात नगरचे तीन खेळाडू

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अहमदनगर ः महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात नगरच्या तीन खेळाडूंची निवड झाली आहे. या निवडीमुळे क्रिकेट वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे यात एका मुलीचाही समावेश आहे. श्रेया गडाख, अशकान काझी, किरण चोरमले अशी या खेळाडूंची नावे आहेत. हे तिघेही हुंडेकरी स्पोर्ट्स ॲकॅडमीचे खेळाडू आहेत. त्यांच्या निवडीमुळे नगरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
हुंडेकरी ॲकॅडमीच्या खेळाडूंचा राज्यभरात दबदबा आहे. यापूर्वीही विजय हजारे करंडक, तसेच रणजी करंडकात ॲकॅडमीच्या खेळाडूंची निवड झाली आहे. गुजरातमध्ये बीसीसीआयने १९ वर्षांखालील मुलींची स्पर्धा आयोजित केली आहे. तीत श्रेया गडाख महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. ही स्पर्धा २९ सप्टेंबरपासून होत आहे.

दिल्ली येथे १९ वर्षांखालील मुलांची स्पर्धा होणार आहे. तीत राज्याच्या संघात नगरच्या किरण चोरमले व अशकान काझीने स्थान पटकावले आहे, अशी माहिती ॲकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक सर्फराज बांगडीवाले यांनी दिली. एडीसीएचे अध्यक्ष आमदार अरुण जगताप व आमदार संग्राम जगताप यांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
हुंडेकरी ॲकॅडमीचे संस्थापक वसीम हुंडेकरी हेही स्टार खेळाडू होते. क्रिकेटची आवड असल्यानेच त्यांनी पदरमोड करीत ॲकॅडमी स्थापन केली. त्याचाच परिपाक म्हणून नगरच्या खेळाडूंना एवढे मोठे व्यासपीठ मिळाले. यापूर्वी महाराष्ट्राकडून रणजी करंडकात ॲकॅडमीचा अझीम काझी, २३ वर्षांखालील संघात यश जाधव, १४ वर्षांखालील संघात रोनक अडाणी, तर १६ वर्षांखालील संघात अतीश भांबरेने प्रतिनिधित्व केले आहे.
कोण काय करते?
श्रेया ही उजव्या हाताने फलंदाजी आणि गोलंदाजीही करते. अशकान हा मधल्या फळीतील फलंदाज आहे. तो डावखुरा असून, फिरकीपटू आहे. किरण हा सलामीवीर आहे. तो गोलंदाजीही करतो, असे प्रशिक्षक हुंडेकरी यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Maharashtra News Live Update: पुण्याच्या शिक्षक मतदारसंघाच्या जागेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

SCROLL FOR NEXT