Nagpur Crime News
Nagpur Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur News: मैत्रिणीशी बोलण्यावरुन झाला वाद, तरुणावर तिघांनी केला जीवघेणा हल्ला

Priya More

Nagpur Crime News: नागपूरमध्ये गुन्हेगारीच्या (Nagpur Crime) घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. मैत्रिणीशी बोलण्यावरुन तिघांनी एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेप्रकरणी नागपूर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. मैत्रिणीशी बोलण्याच्या वादातून एका तरुणावर तिघांनी चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात कपिलनगर येथे राहणारे रोहित उर्फ बजरंग सुनील वाघ (28 वर्षे) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत

रोहितची गेल्या सहा महिन्यांपासून घराजवळ राहणाऱ्या एका तरुणीशी मैत्री झाली. तिच्या नवीन घराचे प्रबुद्धनगर येथे बांधकाम सुरू आहे. तेथे रोहित आणि ती नेहमीच जायचे. रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास ते दोघेही बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर बसून जेवण करत होते. त्याच वेळी तिथे तिघे जण आले. आरोपींनी सोबत चाकू आणला होता.

आरोपींनी रोहितवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात रोहितल्या डोक्याला आणि हाताला गंभीर जखम झाली. रोहितने आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढला. तर त्याच्यासोबत असलेली तरुणी देखील सुरक्षित ठिकाणी जाऊन लपली. रोहितवर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर तिथून फरार झाले. रोहितवर सध्या नागपूरच्या मेडिकलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी रोहितने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून दोघांचा शोध सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंमुळेच गेली 1999मध्ये युतीची सत्ता, देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

Sushma Andhare : 'लाव रे तो व्हिडिओवर' सुषमा अंधारेंची तिखट प्रतिक्रिया; बाळासाहेबांचं नाव घेत राज ठाकरेंना सुनावलं

Horoscope: 1 वर्षानंतर सूर्य होणार शुक्राच्या राशीत विराजमान, 3 राशींचा होणार फायदा; या 2 राशींचे लोक राहा सावध

PoK तापलं; आंदोलनकर्ते आणि पोलीस कर्मचारी आमनेसामने; एका अधिकाऱ्याचा मृत्यू, १०० जण जखमी

RCB vs DC: बेंगळुरूचा 'चॅम्पियन' गेम; पॉईंट्स टेबलमध्ये घेतली भरारी

SCROLL FOR NEXT