धर्माबादच्या दोन बहिणींसह तिघींचा बुडून मृ्त्यू 
महाराष्ट्र

तेलंगणातील तलावात नांदेडच्या दोन सख्ख्या बहिणींसह तिघींचा मृत्यू; सेल्फी काढतांनाची घटना

धर्माबाद शहरापासून बन्नाळी मार्गे तेलंगणा राज्यातील तानुर शहरापासून मुधोळकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शिंगणगाव हे एक खेडेगाव असून या गावांमध्ये तीन तरुण मुली रविवारी दुपारी शेताकडे जाऊन तळ्याकाठी फिरायला गेल्याचे वृत्त आहे.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

धर्माबाद ( जिल्हा नांदेड ) : येथून अवघ्या १० ते १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या तेलंगाणा राज्यातील तानुर मंडलमधील शिंगणगाव येथे सोमवारी (ता. पाच) मोठा हादसा झाल्याचे उघडकीस आले. गावानजीक असलेल्या तलावात तीन मुलींचे मृतदेह सापडले. यामुळे एकच खळबळ उडाली असून गावावर शोककळा पसरली आहे.

धर्माबाद शहरापासून बन्नाळी मार्गे तेलंगणा राज्यातील तानुर शहरापासून मुधोळकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शिंगणगाव हे एक खेडेगाव असून या गावांमध्ये तीन तरुण मुली रविवारी दुपारी शेताकडे जाऊन तळ्याकाठी फिरायला गेल्याचे वृत्त आहे. तलावावर गेल्यानतंर त्या सेल्फी काढण्याच्या नादामध्ये तलावांमध्ये तोल जाऊन तिघींचाही बुडून दुर्दैवी अंत झाला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी घडली असून सोमवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आली आहे.

हेही वाचा - तरोडा (खु) परिसरारत असलेल्या भावसार नगरातील रहिवासी मालिनी विजयकुमार बाहेकर यांची मुलगी मोहिनी हिचा आंतरजातीय विवाह सहा वर्षांपूर्वी श्रीकांत शंकरराव पाडदेवाडसोबत पार पडला.

मृत्त तरुणींची ओळख पटली असून स्मिता येलमे (वय १५), वैशाली येलमे (वय १३) व अंजली लोहबंदे (वय १४) हे ओळख पटलेल्या तरुणींचे नाव असून, सुनिता आणि वैशाली या सख्ख्या बहिणी असून अंजली ही त्यांची बोधन मंडळमधील नातलग असल्याचे सांगण्यात येते. सदरील निरागस तीनही तरुणींचे मृतदेह तलावातील पाण्याबाहेर तरंगताना दिसले. यावेळी गावकऱ्यांनी तानुर पोलिस स्टेशनला माहिती दिल्यावरुन पोलिस निरीक्षक राजन्ना हे घटनास्थळावर दाखल झाले. गावकऱ्यांच्या साथीने तीनही तरुणींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतदेहाचा पंचनामा करुन नातलगाच्या स्वाधीन करण्यात आले असून पुढील तपास श्री. राजन्ना करत असून शिंगणगावात या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

Rahul Gandhi: व्होट चोरीवरून टोकदार प्रश्न, निवडणूक आयोगानं दिली उत्तरं; तुम्ही समाधानी आहेत का?

SCROLL FOR NEXT