bhandara, bail pola, holiday, ganesh utsav saam tv
महाराष्ट्र

Holiday : सलग तीन दिवस सुटी मिळाल्यानं शासकीय कर्मचारी आनंदीत

सणा सुदीचे दिवस असल्याने आज बाजारपेठेत देखील नागरिकांची वर्दळ पहायला मिळत आहे.

अभिजीत घोरमारे

Bhandara News : भंडारा जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळं राखी पाेर्णिमा दिवशी रद्द करण्यात आलेली शासकीय कर्मचा-यांची सुटी आज (शुक्रवार) देण्यात आली आहे. यामुळे पाेळा (bail pola) तसेच आगामी गणेशाेत्सवाच्या पार्श्वभुमीवर आजपासून सलग तीन दिवस सुटी (holidays) मिळाल्याचा आनंद शासकीय कर्मचा-यांच्या चेह-यावर हाेता.

भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे रक्षाबंधन निमित रद्द केलेली शासकीय सुट्टी आज पोळयानिमित्त जाहीर केली. भंडारा जिल्ह्यात अचानक पुर परिस्थिति उद्भवली असल्याने संभाव्य करावयाचा उपाय योजना लक्षात घेता सर्व शासकीय कार्यालयातिल कर्मचाऱ्याची 11 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन निमित्त जाहिर केलेली सुट्टी रद्द केली होती.

त्याची ''बदली सुट्टी" म्हणून आज पोळया निमित्त स्थानिक सुट्टी जाहिर केली आहे. शुक्रवार, शनिवार, रविवार सलग तीन सुट्टया मिळाल्याने कर्मचाऱ्याचा आनंद द्विगुणित झाला आहे. सणा सुदीचे दिवस असल्याने आज बाजारपेठेत देखील नागरिकांची वर्दळ पहायला मिळत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Migraine Home Remedies: डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होताच करा 'हे' ७ घरगुती उपाय; मिळू शकतो झटपट आराम

महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 2 अधिकाऱ्यांची मंत्रालयातच नियुक्ती, कोणाला कुठे जबाबदारी?

Home Remedies : व्हाईट सॉक्स दिसतील एकदम नवीन! घाणेरडे मोजे स्वच्छ करण्याच्या सोप्या घरगुती टिप्स

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

SCROLL FOR NEXT