Solapur Crime विश्वभुषण लिमये
महाराष्ट्र

Solapur Crime: काळ्या बाजारात गॅस सिलेंडर विकणाऱ्या तिघांना अटक

11 लाख 39 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल यातून जप्त करण्यात आला आहे. मोहसीना शेख,वसीम शेख,राजशेखर कोळी असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

विश्वभूषण लिमये

सोलापूर - नऊशे रुपये शासकीय दराने मिळणार स्वयंपाकाचा गॅस काळ्या बाजारात 1200 रुपयाला विक्री करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Solapur Police) अटक केली आहे. 11 लाख 39 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल यातून जप्त करण्यात आला आहे. मोहसीना शेख,वसीम शेख,राजशेखर कोळी असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. (Solaur Latest Crime News)

हे देखील पहा -

सोलापुरातील (Solapur) गोदूताई नविन विडी घरकुल याठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती स्वयंपाकाचा गॅस (Gas) इलेक्ट्रिक मशीनच्या साहाय्याने विनापरवाना रिक्षामध्ये भरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली तेंव्हा तिथे हा प्रकार आढळून आला. या कारवाईमध्ये 11 भरलेल्या टाक्या,05 रिकामी टाक्या,इलेक्ट्रिक मोटार,इतर साहित्य,रिक्षा आणि एक टाटा अल्ट्रा कंपनीची मालवाहतूक गाडी जप्त करण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT