thousands fish found dead in panchganga river  Saam Digital
महाराष्ट्र

Panchganga River: पंचगंगेच्या प्रदूषणावरुन नागरिकांत संताप, महामंडळाचे दुर्लक्ष हजारो मासे मृत्यूमुखी

Kolhapur Latest Marathi News : याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असून याकडे प्रदूषण महामंडळाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. यामुळे नागरिक संताप व्यक्त करु लागलेत.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

प्रदूषित पाण्यामुळे हजारो माशांचा मृत्यू झाल्याचा प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातून समाेर आला आहे. शिरोळ येथील पंचगंगेत मृत माशांचा खच पाहावयास मिळत आहे. मृत माशांमुळे पंचगंगा नदी परिसरात दुर्गंधी पसरली आहे. (Maharashtra News)

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनूसार पंचगंगा नदीत प्रदूषित पाणी आल्याने शिराेळ येथे हजारो मासे मृत्युमुखी पडले. या नदी प्रदुषणाबाबत वेळाेवेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळविण्यात येत हाेते. परंतु मंडळ दुर्लक्ष करीत असल्याचा आराेप ग्रामस्थांनी केला आहे.

सध्या नदीपात्रात मृत माशांचा खच पडला आहे. मासे मृत्युमुखी पडल्यामुळे या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असून याकडे प्रदूषण महामंडळाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांतून प्रदूषण नियंत्रण मंडळाविषयी तीव्र नाराजी पसरली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT