Beed Saam Tv
महाराष्ट्र

Beed: सराफा व्यापाऱ्याच्या लाखोंच्या दागिन्यांसह स्कुटी घेऊन चोरटे पसार, अंबाजोगाईतील घटना

बीडच्या अंबाजोगाईत भरदिवसा चोरट्याने सराफा व्यापाऱ्याचे लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने ठेवलेली स्कुटी घेऊन पोबारा केल्याची घटना घडलीये

विनोद जिरे

बीड: बीडच्या अंबाजोगाईत भरदिवसा चोरट्याने सराफा व्यापाऱ्याचे लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने ठेवलेली स्कुटी घेऊन पोबारा केल्याची घटना घडलीये. तर ही घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली असून स्कुटीची डिग्गी तोडून त्यातील सोने चोरुन घेऊन जाताना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.

बीड (Beed) येथील अंबाजोगाई शहरातील सराफा (Sarafa) व्यापारी राहुल राठोड यांचे गुरुवार पेठेत सोन्या-चांदीचे दुकान आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री दुकान (Shop) बंद करून गेल्यानंतर, चोरट्यांनी शटरच्या कुलुपात फेवीक्विक आणि वाळू टाकली. सकाळी राठोड नेहमीप्रमाणे स्कुटीच्या डिकीत सोन्याचे दागिने घेऊन दुकानाकडे आले. परंतु, कुलूप उघडत नसल्याने ते स्कुटी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकातील चावीवाल्याकडे गेले.

यावेळी ते चावी वाल्यासोबत बोलत असताना चोरट्यांनी (Thief) त्यांची स्कुटी घेऊन पोबारा केला. त्या स्कुटीच्या डिकीत लाखो रुपयांचे दागिने होते. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसांत गुन्हा दाखल (FIR) झालाय. दरम्यान, या घटनेमुळे अंबाजोगाई शहरात खळबळ उडाली असून व्यापारी वर्गात दहशत निर्माण झाली आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan 2025 : श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरु होतोय?

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, CM फडणवीसांनी दिलं मोठं गिफ्ट

‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडावर भक्तांनी घेतले विठुरायाचे दर्शन

SCROLL FOR NEXT