Sambhajinagar Saam
महाराष्ट्र

Hanuman Jayanti: हनुमान जयंतीच्या दिवशीच मंदिरात चोरांचा डल्ला, चांदीचे डोळे चोरण्याचा प्रयत्न

Hanuman Jayanti Celebrations Marred by Temple Burglary Attempt: एकीकडे शहरात हनुमान जयंतीच्या जय्यत तयारीने भक्तिमय वातावरण असताना, दुसरीकडे मात्र भावसिंगपुरा परिसरातील पाटील खोऱ्यातील चिरीखाना हनुमान मंदिरात चोरीचा प्रयत्न झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

Bhagyashree Kamble

एकिकडे हनुमान जयंतीची जय्यत तयारी सुरू असताना, मात्र दुसरीकडे हनुमान मंदिरातच चोरीचा प्रयत्न झाला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात ११ मार्चला भावसिंगपुरा परिसरातील पाटील खोऱ्यातील चिरीखाना हनुमान मंदिरात चोरीचा प्रयत्न झाला. पुजाऱ्याकडून घटनेची माहिती मिळताच या भागातील नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मूर्तीची पुन्हा प्राणप्रतिष्ठा करून आरती केली. या घटनेची माहिती मिळताच छावणी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला आहे.

छत्रपती संभाजी नगर शहरात ११ मार्चच्या सायंकाळी सगळीकडे हनुमान जयंतीची जय्यत तयारी सुरू होती. या दरम्यान गावातील हनुमान मंदिरातच चोरीची घटना घडली. भावसिंगपुरा परिसरातील पाटील खोऱ्यातील चिरीखाना येथे हनुमान मंदिर आहे. या मंदिरातच हनुमान जयंतीच्या पुर्वसंध्येला चोरट्याकडून चोरीचा प्रयत्न झाला.

याची सर्वात आधी माहिती पुजारी यांना मिळाली. पुजाऱ्याने याची माहिती नागरिक आणि पोलिसांना दिली. पुजाऱ्याकडून घटनेची माहिती मिळताच या भागातील नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मूर्तीची पुन्हा प्राणप्रतिष्ठा करून आरती केली. छावणी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

११ मार्चला दुपारी बारा ते साडेबारादरम्यान मंदिराचे पुजारी घरी गेले होते. दुपारनंतर हा प्रकार समोर आल्याची माहिती या भागातील नागरिकांनी दिली. आज या मंदिरात मोठा उत्सव आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते. दुपारनंतर या कार्यक्रमाची तयारी सुरू असताना हा प्रकार उघडकीस आला. घडलेला प्रकार हा मूर्तीचे चांदीचे डोळे चोरण्याच्या उद्देशाने झाला असावा, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटना घडताच मंदिराच्या आवारात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार संजय केणेकर यांनी मंदिरात भेट दिली. त्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ओमराजे सध्या कोर्टात हजर

Cancer symptoms: शरीरात ही ५ मोठी लक्षणं दिसली तर असू शकतो कॅन्सरचा ट्यूमर

चटकदार अन् भरपेट! अंबाडीच्या पानांच्या बनवा पातोड्या; सोपी स्टेप बाय स्टेप रेसिपी लगेचच करा नोट

आषाढी वारीसाठी सरकारचं मोठं गिफ्ट! वारकऱ्यांसाठी 5500 ST बसेस, कोणत्या मार्गावरून धावणार?

International Yoga Day : योगा करण्यापूर्वी चुकूनही करू नका ‘ही’ ५ कामे, निष्काळजीपणा पडेल महागात

SCROLL FOR NEXT