सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत - सतेज पाटील  ओंकार कदम
महाराष्ट्र

सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत - सतेज पाटील

आज सातारा येथे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला यावेळी बोलत असताना त्यांनी राज्यातील चालू घडामोडींवर जोरदार प्रतिक्रिया दिल्या.

ओंकार कदम

सातारा : आज सातारा येथे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला यावेळी बोलत असताना त्यांनी राज्यातील चालू घडामोडींवर जोरदार प्रतिक्रिया दिल्या. 102 व्या घटनादुरुस्ती बाबत केंद्राकडून कृती झाली पाहिजे. नेमकी कृती काय होणार आहे यावर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. आता केंद्र शासनाला यामधून पळ काढता येणार नसल्याचे सतेज पाटील यांनी साताऱ्यात बोलताना सांगितले.

हे देखील पहा -

या वेळी बोलत असताना त्यांनी सरकार मध्ये कोणतेही मतभेद आणि गैरसमज नसल्याचे स्पष्ट केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यांचा विपर्यास केला जात असून अनेक ठिकाणी युतीत आम्ही लढलो आहोत. जिथं शक्य असेल तिथं युती होणार असून सरकारमध्ये कोणतेही मतभेद आणि गैरसमज नाहीत.

सातारा पोलीस दलात बदली केल्यावरून पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला यावर बोलताना पाटील म्हणाले कि, हे पाऊल त्यांनी उचलायला नको होते. सर्व पोलिसांना एकसारखा नियम लावण्याच्या सूचना पोलीस अधिक्षकांना दिल्या असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

चित्रा वाघ यांच्यावर निशाणा :

चित्रा वाघ यांची पार्श्वभूमी संपूर्ण महाराष्ट्राने पहिली असून त्यांना बोलायचा अधिकार आहे का? काहीतरी सनसनाटी आरोप करून चर्चेत राहण्यापलीकडे काही काम करताना चित्रा वाघ दिसत नाहीत. आम्ही काय काम करतो याचे सर्टिफिकेट भाजपने का द्यावे? ईडीचा वापर दुर्दैवाने सूडबुद्धीने केला जात असल्याचे देखील मंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केतनच्या हत्येचं बीड कनेक्शन उघड, केतन हत्या प्रकरणात तिसरा कोण?

आधी लग्न लपवलं, रहस्य उघडकीस आलं अन् प्रेयसीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळलं, क्रूर कृत्याने संतापाची लाट

MPSC Recruitment: MPSC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ग्रुप-सीच्या २,६१९ पदांसाठी बंपर भरती; कुठे अन् कसा कराल अर्ज?

Monsoon Health Care: पावसाळ्यात वारंवार पोट बिघडतंय? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय

Rain Alert: मुंबईसह ठाणे-रायगडमध्ये पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस; पालघर- ठाण्यात उद्या शाळांना सुट्टी

SCROLL FOR NEXT