Mumbai Naka Police Station
Mumbai Naka Police Station Saam Tv
महाराष्ट्र

लग्नासाठी आलेल्या महिलेच्या पर्समधील दागिन्यांची चोरी; नाशिकमध्ये महिला चोरांची टोळी सक्रिय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तबरेज शेख

नाशिक - महिलांवर पाळत ठेवून रिक्षा अथवा बस प्रवासात त्यांच्या पर्समधून मौल्यवान वस्तू यांची चोरी करणारी महिला टोळी सध्या नाशिक शहरात चांगलीच सक्रिय झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अश्या घटनांमध्ये वाढ होऊन या महिला चोरांकडून लाखोंचे मौल्यवान वस्तू प्रवासी महिलांच्या पर्स मधून चोरल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पुन्हा एकदा अशीच एक घटना नाशिकमध्ये समोर आली आहे.

चुलत भावाच्या लग्नासाठी कल्याणवरून नाशिकला आलेल्या महिलेच्या पर्स मधून 2 लाखांचे दागिने रिक्षा प्रवास करत असताना तिन अज्ञात महिला पैकी एकीने चोरल्याची तक्रार पंचवटी पोलीस ठाण्यात करण्यात देण्यात आली आहे. त्यामुळे या वाढत्या घटना पाहता महिला चोरांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभ राहिला आहे.

हे देखील पाहा -

रिक्षा आणि सिटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरीच्या घटना दिवसंदिवस वाढत आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी मुंबई नाका पोलिसांनी दोन महिला चोरांना पकडून त्यांच्याकडून रिक्षमध्ये महिलांचे दागिने चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहे. असे असले तरी मात्र देखील नाशिकमध्ये रिक्षा मध्ये महिलांच्या पर्स मधून दागिने चोरीच्या घटना काही थांबत नसल्याचे दिसून येत आहे.

सद्या लग्न सराई सुरू आहे अश्या वेळी महिलांनी देखील आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेणं गरजेचे आहे. अनेक महिला सोन्याचे दागिने घालून लग्नात जातात. मात्र तुमच्या दागिन्यांवर महिला चोरांची नजर आहे. त्यामुळे दागिने घालून बाहेर जात असाल तर स्वताच्या दागिने सांभाळा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OLA Layoffs : 'ओला'मधील 10 टक्के कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड; CEO बख्शींनी दिला ३ महिन्यात राजीनामा

Today's Marathi News Live : बुलढाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई; जलाशयात फक्त 11. 62 टक्के पाणीसाठा.

Kenya Dam Burst : केनियामध्ये मोठी दुर्घटना; धरण फुटल्याने ३५ जणांचा मृत्यू, रात्री गाढ झोपेतच नागरिक वाहून गेले

IMD Report: देशात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा; तर काही भागात जोरदार पावसाची शक्यता; वाचा IMD रिपोर्ट

Shukra Gochar 2024: शुक्राच्या राशी बदलामुळे 'या' ३ राशी होणार धनवान

SCROLL FOR NEXT