Hingoli Balapur Thief Saam Tv
महाराष्ट्र

चोरट्यांनी उडविली बाळापूरकरांची झोप; हातात लाठ्या-काठ्या घेऊन नागरिकांचा पहारा

Hingoli : गावातील युवक हातात लाठी काठी व बॅटरी घेऊन गावाची सुरक्षा करत आहेत

संदीप नागरे

हिंगोली : हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात मध्यरात्री साखरझोपेत असलेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने पळवणारे चोरटे सक्रीय झाले आहेत. या चोरट्यांनी नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील गावात धुमाकूळ घातल्याने खळबळ उडाली आहे. मात्र पोलिसांना (Police) या चोरट्याचा शोध लागत नसल्याने आता गावकऱ्यांनीच, आपल्या गावातील नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी गावात खडा पहारा सुरू करत गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. गावातील युवक हातात लाठी काठी व बॅटरी घेऊन गावाची सुरक्षा करत आहेत.

दोन दिवसांपूर्वी कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर (Akhada Balapur) गावातील रहिवाशी गौतम वाठोरे आणि संदीप चव्हाण यांच्या घरावर चोरट्यांनी (Thief) डल्ला मारला होता. मध्यरात्रीच्या सुमारास आलेल्या या चोरट्यांनी घरातून सोने चांदी तसेच रोख रक्कम लंपास केली होती. दरम्यान, चोरटे चोरीसाठी घरात शिरले असताना त्यांची घरातील कुटुंबियांसोबत झटापट झाली. या झटापटीत एका महिलेच्या कानाला दुखापत झाली. याप्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मात्र, गुन्हा दाखल होऊन 10 दिवसांपेक्षा जास्त कालावधी लोटला, तरीही चोरटे शोधण्यास पोलिसांना अपयश आले. अशात आता गावातील गावकऱ्यांनी गावाच्या सुरक्षेसाठी स्वत:च गावाचे रक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. चोरटे पुन्हा गावात शिरता कामा नये याची दक्षता घेत, गावातील युवक हातात लाठी काठी आणि बॅटरी घेऊन गावाची सुरक्षा करत आहेत.

दुसरीकडे चोरट्यांचा शोध घेण्यासाठी आखाडा बाळापूर पोलिसांच्या पथकासह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना करण्यात आले आहेत. या चोरट्यांना लवकरच जेरबंद करण्यात येणार असल्याची माहिती हिंगोली पोलीस दलातर्फे देण्यात आली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गुलाबराव पाटील यांनी मुलासाठी मागितली उमेदवारी

CNG Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री! पेट्रोल-डिझेलनंतर आता CNGही महागला, जाणून घ्या नवीन दर

डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न; IRGCनं रचला होता कट

Long Hair Tips: केस होतील कंबरेपर्यंत लांब, आजच ट्राय करा 'या' ५ सोप्या घरगुती टिप्स

Petrol Diesel Price Today : पेट्रोल डिझेलच्या किमतीत दहा दिवसात तिसऱ्यांदा वाढ, सर्वसामान्यांना मोठा फटका; आजचा दर किती ? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT