sangli Crime News SaamTv
महाराष्ट्र

Tahsildar Office : तहसील कार्यालयातील चाेरीची दबक्या आवाजात चर्चा; अधिका-यांच्या भूमिकेकडे लक्ष

यापूर्वीदेखील जप्त केलेली वाहने राञीचेच कंपाऊंड तोडून पळवून नेल्याचा प्रकार घडला होता.

विजय पाटील

Tahsildar Office : विट्याच्या तहसील कार्यालयातच चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रशासकीय इमारतीच्या आवारातच चोरी घडल्याने सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (Sangli Latest Marathi News)

विटा (Vita) येथील प्रशासकीय कार्यालय इमारतीच्या पाठीमागे महसुल प्रशासनाने बेकायदेशीर वाळू व गौणखनिज वाहतुक करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई करत वाहनेे जप्त केली आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून ही वाहने याठिकाणी सडत पडली असून आता त्यांचीही चोरी होवू लागली आहे. (Breaking Marathi News)

जप्त केलेल्या वाहनांची चाकेच चोरट्यांनी पळवून नेली आहेत. यापूर्वीदेखील जप्त केलेली वाहने राञीचेच कंपाऊंड तोडून पळवून नेल्याचा प्रकार घडला होता. आता ही वाहने नेण्याऐवजी त्याचे स्पेअर पार्टच हे चोरटे गायब करत आहेत.

या ठिकाणी जनरेटर बसविला आहे. परंतू तो देखील गेल्या कित्येक महिन्यांपासून धुळ खात पडला आहे. आता याकडे तहसिलदार कसे पाहतात ? व काय उपाययोजना करतात हे माञ पहावे लागणार आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Case Live Update : शिंदेंना 'मुख्य नेता' पद दिलं कुणी?, कपिल सिब्बल यांच्या एकाच प्रश्नाने सुप्रीम कोर्टात खळबळ

Crime: माझ्यापेक्षा मुलीवर जास्त प्रेम करते, तरुणाने जन्मदात्या आईला संपवलं, नवी मुंबईतील संतापजनक घटना

मुलांच्या क्रिएटिव्हिटीला द्या पंख, १५ ऑगस्टनिमित्त घरी आणि शाळेत बनवा सुंदर 5 क्राफ्ट

Viral Video : सोसायटीत रात्री पावणेदोनला थरार, भरधाव कारने गेटला दिली जोरदार धडक; दैव बलवत्तर म्हणून वॉचमन थोडक्यात बचावला

पुण्यात ब्रिटनहून आलेला 'तो' धर्मगुरू अन् चर्चमधील 'ते' रहस्यमय प्रवचन! नव्या कायद्यांतर्गत महाराष्ट्रातली पहिलीच मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT