तब्बल 24 शाळांमध्ये चोरी करणारे गजाआड; लाखोंचा मुद्देमाल जप्त  Saam TV
महाराष्ट्र

तब्बल 24 शाळांमध्ये चोरी करणारे गजाआड; लाखोंचा मुद्देमाल जप्त

मात्र या चोरट्यांना शोधण्यात पोलीस अपयशी ठरू लागले होते.

दिनू गावित

नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar District) विविध पोलीस ठाणे अंतर्गत मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषद शाळेचे (ZP School Nandurbar) कुलूप तोडून इन्व्हर्टर, बॅटरी, एलईडी, टीव्ही, एंपलीफायर अशा अनेक वस्तूंची चोरी गेल्या काही दिवसापासून घडत होती. मात्र या चोरट्यांना शोधण्यात पोलीस अपयशी ठरू लागले होते. जिल्ह्यात एक दोन नव्हे तर तब्बल २४ जिल्हा परिषदेचे शाळांमधील डिजिटल साहित्यावर चोरट्यांनी डल्ला मारला होता. चोरीची तक्रार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता त्यामुळे पोलिसांसमोर एक आव्हान उभा राहिलं होतं.

मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी पथक तयार केले, आणि गुन्हेगारांना शोधून काढलं या आरोपींकडून इन्वर्टर, बॅटरी, एलईडी टीव्ही, मोटर सायकल, पंखा, साऊंड सिस्टिम, वस्तू मिळून आले आहे. चोरी झालेल्या २४ शाळांपैकी जवळपास १८ जिल्हा परिषद शाळेच्या साहित्य पोलिसांना मिळविण्यात यश आले आहे. त्यासोबत ३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून आरोपींकडून ३ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng सामना उशिराने सुरु, पावसामुळे भारताची विजयाची संधी हुकणार?

Bogus Soyabean Seeds : पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्यांकडून सोयाबीनची दुबार पेरणी

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

SCROLL FOR NEXT