Aurangabad Crime News saam tv
महाराष्ट्र

Aurangabad Crime News : विशाल नगरात धूम स्टाईलनं महिलेच्या मंगळसूत्रावर चोरट्यांचा डल्ला

ही घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहे.

साम न्यूज नेटवर्क

- नवनीत तपाडिया

औरंगाबाद : भावाकडे राखी बांधायला (Raksha Bandhan) निघालेल्या बहिणीच्या मंगळसूत्रावर चोरट्यांनी डल्ला मारल्याचा प्रकार नुकताच शहरात (Aurangabad) उघडकीस आला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहरात चोख बंदोबस्त असताना देखील चोरट्यांचा सुळसुळाट वाढल्याने नागरिकांत भितीचे वातावरण आहे. (Aurangabad Crime News)

पुंडलिक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विशाल नगर येथे महिला आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी रात्री नऊ वाजता त्यांच्या दाेन मैत्रिणींसमवेत निघाल्या होत्या. मात्र भावाने गिफ्ट देण्याच्या अगोदरच चोरट्यांनी त्यांच्याच मंगळसूत्रावर डल्ला मारला.

या महिला विशाल नगर येथील रस्त्याने जात असताना समोरून मोटारसायकल वरून येणाऱ्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले आणि धूम ठोकली. महिलांनी भामट्यांचा पाठलाग केला. मात्र त्याला पकडून शकल्या नाहीत. दरम्यान ही सर्व घटना तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाहन चालवताना सावध राहा, 5 राशींचा वाढेल खर्च; वाचा बुधवारचे राशीभविष्य

धक्कादायक ! १४ वर्षीय मुलीवर तीन अल्पवयीन मुलांकडून सामूहिक बलात्कार

उत्तर प्रदेशमध्ये सत्ता समीकरण बदललं; ब्राह्मण समाजाच्या आमदारांच्या नाराजीनंतर भाजप करणार मोठे बदल

Maharashtra Live News Update : भाजप जिल्हाध्यक्षकडे २ मतदान ओळखपत्र, शिवसेना नेत्याचा आरोप

Mi Savitribai Jyotirao Phule: इतिहास, परंपरा आणि भावना; सावित्री-जोतीरावांच्या विवाहातून उलगडणार ऐतिहासिक पर्व

SCROLL FOR NEXT