पावसाच्या पाण्यातून नाला ओलांडांताना युवक गेला वाहून! अभिजीत घोरमारे
महाराष्ट्र

पावसाच्या पाण्यातून नाला ओलांडांताना युवक गेला वाहून!

तुमसर तालुक्यामधील पवनारा गावात जाणारा रस्ता पाण्या खाली गेल्यामुळे काल सायंकाळी भारत परतेती हा युवक नाला पार करत असताना त्याला पाण्याचा अंदाज़ न आल्याने तो नाल्यात वाहून गेला.

अभिजीत घोरमारे

भंडारा : नाला ओलांडांताना युवक वाहून गेल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यातील Bhandara District तुमसर तालुक्यातील पवनारा या गावात घडली आहे. भारत परतेतीBharat Parteti वय (35) असे वाहुन गेलेल्या युवकाचे नाव आहे. हवामान विभागाने Meteorological Department वर्तविलेल्या अंदाजानुसार मागील दोन दिवसांपासून भंडारा जिल्हात पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे अनेक नदी नाले तुडंब भरून वाहत आहेत. तर तुमसर तालुक्यातील पवनारा गावात जाणारा रस्ता पाण्या खाली गेला असल्याने काल सायंकाळी 6 च्या सुमारास भारत परतेती वय 35 वर्ष हा युवक नाला पार करत असताना त्याला पाण्याचा अंदाज़ न आल्याने तो नाल्यात वाहून गेला.The youth was carried away by the rain water

हे देखील पहा-

हा युवक नाल्यात वाहून गेल्याची माहिती गावकऱ्यांना समजताच गावकऱ्यांनी त्याचा शोध सुरु केला मात्र त्याचा मृतदेह अद्याप हाती लागला नसल्याने आज आपत्ति व्यवस्थापण विभागा तर्फे त्याचा शोध कार्य सुरू आहे.

पावसाच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते तुंबले जातात आणि लोक प्रसंगी पर्यायी रस्त्याने आपल्या घराकडे जातात किंवा पाण्यातून मार्ग काढण्याचे वेडे धाडस करतात. मात्र पर्यायी रस्त्यांची सर्व ओळख आपणाला नसते आणि पाण्याचा अंदाजही त्यामुळे अनेक जण आपले प्राण गमावतात त्यामुळे पावसाळ्यांमध्ये आपण माहित असलेल्या रस्त्यांनीच जाण योग्य थोडा वेळ लागेल मात्र जीव वाचेल अशी भूमिका सर्वांनी घेतली तर जीवित हाणी होणार नाही.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer India: जगात कॅन्सर कमी; भारतात मात्र वाढ! तज्ज्ञांनी दिला धक्कादायक इशारा

High Court: विभक्त असेल तरी पत्नीला मिळेल फॅमिली पेन्शनचा लाभ; उच्च न्यायालयाचा निर्णय

Hingoli: राज्यात पावसाचं रौद्ररूप! पण दुसरीकडे शिंदेंच्या राम कदमांच्या नवरात्रौत्सवात गौतमी पाटीलचा कार्यक्रम

Maharashtra Live News Update: मंदिरात दर्शनासाठी जात असताना अंगावर भिंत कोसळली

Election : महानगरपालिका निवडणुकासंदर्भात मोठी अपडेट, 'स्थानिक'नंतर मनपा निवडणुकीचा बार उडणार?

SCROLL FOR NEXT