गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या भुसेवाडा आणि गुंडेनूर येथील ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधलेला बांबूचा पूल सध्या चर्चेत आहे. लाहेरी गावापासून 4 किलोमीटरवर अंतरावर गुंडेनूर नाला आहे. या नाल्याला बाराही महीने पाणी असल्याने नाल्यावर पुल बांधण्याची मागणी मागील अनेक वर्षापासून होत आहे.
मात्र, याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. इथल्या नागरिकांसाठी पावसाळ्यात बिकट परिस्थिती उद्भवत आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून वाहत्या पाण्यातून मार्गक्रमण करत नाला पार करावा लागत आहे. यावर काय उपाय करता येईल, यासंबंधी गावकऱ्यांनी स्वतः निर्णय घेऊन येथील नाल्यावर बांबू पूल तयार करण्याचे ठरवले होते. भुसेवाडा आणि गुंडेनूर गावात जाण्यासाठी 3- 4 वर्षांपूर्वी कच्चा रस्ता बनविण्यात आला आहे.
हे देखील पहा-
बारमाही वाहणारा मोठा नाला ग्रामस्थांसाठी मोठा अडसर होता. पूल नसल्याने गावातील नागरिकांना रात्री- बेरात्री धोकादायक घनदाट जंगलात कमरेभर पाण्यातून वाट काढत जावे लागत असत. त्यात रात्री कोणी आजारी पडल्यास रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध होत नाही. पायी वाट काढणेेेे देखील जिकरीचे ठरत होते. गरोदर मातेच्या बाळंतपणासाठी आशा वर्कर यांना प्राथमिक उपकेंद्र येथे माहिती देण्यास जाण्याकरिता पाण्यातून वाट काढायला खुप त्रास सहन करावा लागायचा. गावात येणारे शिक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका असे कोणत्याही अधिकारी-कर्मचा-यांना सुद्धा ओले होऊनच गावात जाव लागत असत.
ग्रामस्थांनी तात्पुरत्या पुलाचे बांधकाम करण्याचे उपाय शोधले आहे. गावात बांबू मुबलक प्रमाणात असल्याने लोकसहभागातून बांबूचा पूल तयार करण्याची संकल्पना मांडली आहे. सर्वानुमते बांबू पुल तयार करण्याचे ठरविले. याकरिता लागणारे सर्व साहित्य जमा करून मोटार सायकल जाऊ शकेल, अशा प्रकारच्या बांबू पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. या कामाचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक करण्यात येत असून यामुळे काही काळाकरीता का होईना पण जाण्या- येण्याकरीता मार्ग तयार झाला आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.