अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयाचा होणार कायापालट; 15 कोटी मंजूर SaamTvNews
महाराष्ट्र

अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयाचा होणार कायापालट; 15 कोटी मंजूर

धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांना यश..

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यातील महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या, अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयाचा आता कायापालट होणार आहे. रुग्णालय विस्तारीकरणासाठी शासनाने तब्बल 15 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.

हे देखील पाहा :

स्वामी रामानंद तीर्थ हे बीड जिल्ह्यातील एकमेव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असून, येथील रुग्णालयात आरोग्यविषयक सर्व सुविधा उपलब्ध असाव्यात, कोणत्याही प्रकारच्या आजारावर इथे उपचार मिळावेत व यासाठी आवश्यक यंत्र सामग्री व तज्ञ डॉक्टर्स इथेच उपलब्ध व्हावेत यासाठी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे प्रयत्न करत आहेत.

तर, आज निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाप्रमाणे रुग्णालयात नव्याने बांधण्यात आलेल्या 230 खाटांच्या इमारतीमध्ये, वरती एक मजल्याचे बांधकाम करण्यात येणार असून तेथे आणखी 6 वॉर्ड, 4 ऑपरेशन थिएटर तसेच 4 विभाग उभारण्यात येणार आहेत. यासाठी 14 कोटी 99 लाख 39 हजार रुपये खर्चास वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. दरम्यान यामुळे आता बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना चांगली सेवा मिळणार असून या रुग्णालय विस्तारीकरणाचा नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT