Car Fire On Samriddhi Highway माधव सावरगावे
महाराष्ट्र

Car Fire On Samriddhi Highway: नव्या-कोऱ्या समृद्धी महामार्गावर बर्निंग कारचा थरार; धावत्या कारनं अचानक घेतला पेट, पाहा Video

Samriddhi Highway News: औरंगाबादनजीक वैजापूरजवळील गलांडे वस्तीजवळील ही दुर्देवी घटना घडली आहे. या थरारक घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

Samruddhi Mahamarg Today News: ११ डिसेंबरपासून सुरू करण्यात आलेल्या समृद्धी महामार्गाबाबत एका थरारक घटना समोर आली आहे. शिर्डी नागपूर या समृद्धी महामार्गावर एका धावत्या कारनं अचानक पेट घेतला आहे. या आगीत कार जळून खाक झाली आहे. औरंगाबादनजीक वैजापूरजवळील गलांडे वस्तीजवळील ही दुर्देवी घटना घडली आहे. या थरारक घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. (The Burning Car News)

धावत्या कारमध्ये काहीतरी जळाल्याचा वास येत असल्याने चालकाने कार हायवेच्या एका बाजूला उभी केली. इतक्यात कारने (Car) अचानक पेट घेतला. ही आग इतकी भयंकर होती की या आगीत (Fire) कार‌ जळून खाक झाली आहे. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते, मात्र या आगीचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही. (Latest Marathi News)

पाहा व्हिडिओ -

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबरला समृद्धी महामार्गाचं (Samruddhi Highway) लोकार्पण करण्यात आले होते. त्यानंतर तिसऱ्या दिवशीच वायफळ टोल नाक्यावर दोन कारमध्ये अपघात झाल्याचे समोर आले होते. या घटनेत सुदैवाने कोणीही गंभीर जखमी झालेले नसले तरी दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले होते. सोबतच एक स्विफ्ट कार आणि मर्सिडीज कारचीही धडक झाली होती. त्यामुळे समृद्धी महामार्गावरील अपघात वाढत आहे. (Breaking Marathi News)

समृद्धी महामार्गाची वैशिष्टये -

• लांबी ७०१ किमी • एकूण जमीन : ८३११ हेक्टर • रुंदी : १२० मीटर • इंटरवेज : २४ • अंडरपासेस : ७०० • उड्डाणपूल : ६५ • लहान पूल : २९४ • वे साईड अमॅनेटीझ : ३२ • रेल्वे ओव्हरब्रीज : ८ • द्रुतगती मार्गावरील वाहनांची वेगमर्यादा ताशी : १५० किमी (डिझाइन स्पीड) • द्रुतगती मार्गाच्या दुतर्फा झाडांची संख्या : साडे बारा लक्ष • कृषी समृद्धी केंद्रे : १८ एकूण गावांची संख्या : ३९२ • प्रकल्पाचा अंदाजित खर्च: ५५ हजार कोटी रुपये • एकूण लाभार्थी : २३ हजार ५०० • वितरित झालेला मोबदला : ६ हजार ६०० कोटी रुपये • कौशल्य विकास प्रशिक्षणाचे लाभार्थी : ३५६ • द्रुतगती मार्गालगत सीएनजी/ पीएनजी गॅस वाहिनी : गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया मार्फत • ऑप्टिकल फायबर नेटवर्कचे जाळे

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

SCROLL FOR NEXT