नाशकात 6 नोव्हेंबरपासून हेल्मेटसक्तीचा तिसरा टप्पा; होणार कडक कारवाई... अभिजीत सोनावणे
महाराष्ट्र

नाशकात 6 नोव्हेंबरपासून हेल्मेटसक्तीचा तिसरा टप्पा; होणार कडक कारवाई...

नाशकात नो हेल्मेट नो पेट्रोल, विनाहेल्मेट दुचाकीचालकांचं समुदेश या मोहिमेनंतर आता हेल्मेटसक्तीचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे.

अभिजीत सोनावणे, सामटीव्ही नाशिक

नाशिक: नाशिक शहरात हेल्मेटसक्तीचा तिसरा टप्पा पुढील महिन्यापासून राबवला जाणार असून यामध्ये शहरातील शासकीय, निमशासकीय कार्यालयांच्या आवारात विना हेल्मेट दुचाकीचालकाला प्रवेश बंदी करण्याचा निर्णय पोलीस आयुक्तांनी घेतला आहे. (The third phase of compulsory helmet rule from November 6 in Nashik; Strict action to be taken)

हे देखील पहा -

शहरात 29 जुलैपासून हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात नो हेल्मेट नो पेट्रोल, त्यानंतर विनाहेल्मेट दुचाकीचालकांचं 2 तास समुपदेशानंतर आता हेल्मेट नसल्यास कोणतही सहकार्य न करण्याचा निर्णय पोलीस आयुक्तांनी घेतला आहे. तसा आदेशच पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी काढलाय. त्यानुसार 6 नोव्हेंबरपासून शहरात शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांच्या आवारात विनाहेल्मेट दुचाकीचालकास प्रवेश बंदी केली जाणार आहे. शहरातील शाळा, कॉलेज, विद्यापीठ, कोचिंग क्लासेस, सर्व पार्किंग ठिकाणं, औद्योगिक क्षेत्र, शासकीय कार्यालये, महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि अन्य निमशासकीय कार्यालयांमध्ये विनाहेल्मेट दुचाकीचालकास प्रवेश बंदी केली जाणार आहे. या सर्व ठिकाणी व पेट्रोलपंपावर सीसीटीव्ही बंधनकारक करण्यात आले आहेत.

शासकीय आणि निमशासकीय कार्यालयाच्या आवारात विनाहेल्मेट दुचाकीचालक आढळून आल्यास त्यास 8 दिवसांचा तुरुंगवास अथवा बाराशे रुपये दंड केला जाणार आहे. वाहतूक विभागाची भरारी पथके शासकीय आणि निमशासकीय ठिकाणी तपासणी करून संबंधित चालकांवर कारवाई करणार आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

SCROLL FOR NEXT