शेतकऱ्याची फळबाग अज्ञाताने कापून टाकल्या मोठे नुकसान झाले. 
महाराष्ट्र

चीड आणणारा खोडीलपणा... अज्ञाताने शेतकऱ्याची फळबाग कापली

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अहमदनगर : हमी भावाची कमी हेच शेतकऱ्यांच्या अधोगतीचे कारण नाही तर अनेक कारणांनी त्याला पिडले जाते. कधी भाऊबंदकी तर कधी चोरांचा सामना करावा लागतो. शेतातून विद्युत पंपाची चोरी किंवा फळबागांचे नुकसान केले जाते. कधी फळ चोरून नेले जातात. शेवगाव तालुक्यात घडलेला प्रकार पाहता शेतकरीच काय इतर कोणाच्याही काळजात चर्र होईल.The thief cut down the farmer's custard apple orchard abn79

शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील शेतकरी अशोक रमेश म्हस्के यांच्या फळबागेच्या शेतामधील जवळपास शंभर-सव्वाशे सीताफळ झाडांची अज्ञात इसमाने शुक्रवारी (ता. २७) रात्री कत्तल केली. ही फळ झाडे खोडापासून तोडून टाकली आहेत. संबंधित शेतकऱ्याने शेवगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून दोषींविरोधात कडक कारवाईची मागणी केली.

बालमटाकळी येथील शेतकरी अशोक रमेश म्हस्के (वय २७) यांनी दोन वर्षांपूर्वी उसनवारीचे पैसे तसेच काही बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेतले. त्यातून गट नंबर ४१/५ मधील दीड एकर क्षेत्रात साडेसहाशे सीताफळाच्या झाडाची लागवड केली.

दोन वर्षांपासून फळबागेस जीवापाड जपल्याने ती बहारात आली. ऐन फळधारणेच्या कालावधीतच त्यांच्यावर कोणीतरी खोडील माणसाने सूड उगवला. त्यांच्या शेतातील जवळपास शंभर-सव्वाशे सीताफळ झाडे खोडापासून तोडून टाकली. म्हस्के हे नेहमीप्रमाणे सकाळी शेतात गेले, तेव्हा त्यांच्या ह्रदयाचा ठोकाच चुकला. कारण समोर तोडून टाकलेली झाडे दिसताच ते हबकून गेले.The thief cut down the farmer's custard apple orchard abn79

त्यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात या बाबत फिर्याद दाखल केली. रविवारी सकाळी बोधेगाव पोलिस दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भगवान बडधे, पोलीस कर्मचारी नामदेव पवार, महसूल विभागाचे तलाठी बाबासाहेब अंधारे, कृषी सहाय्यक गणेश पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भगवान बडधे हे करीत आहेत. दरम्यान, दोषींविरोधात कडक कायदेशीर कारवाई करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाने भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Syed Mushtaq Ali Trophy: ऐन सामन्यात यशस्वी जैस्वालची तब्येत अचानक बिघडली, पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात दाखल

डोंबिवली स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा अतिक्रमणाचा विळखा; रेल्वे प्रवाशांची वाट काढताना दमछाक

Thursday Horoscope : अचानक धनलाभ होईल, कुटुंबातील सदस्य खूश होतील; ५ राशींच्या लोकांच्या मनासारख्या घटना घडतील

IND vs SA 4th T20I: भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात धुक्याचा खोडा; चौथा टी२० सामना रद्द

T2O वर्ल्डकप आधीच टीम इंडियाला मोठा झटका; प्रमुख खेळाडू संघाबाहेर, कारण काय?

SCROLL FOR NEXT