बीड - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो, यासाठी एका बीडच्या शिवसैनिकाने तिरुपतीला नवस बोलला होता आणि नवस फेडण्यासाठी तब्बल 1100 किलोमीटर पायी जात असताना रस्त्यातच ते आजारी पडले. उपचारादरम्यान अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
आपल्या लाडक्या नेत्याला दीर्घायुष्य लाभो म्हणून तिरुपतीला साकडे घालण्यासाठी पायी जात असताना ते आजारी पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एक कट्टर शिवसैनिक म्हणून सुमंत रुईकर यांची मातोश्री पर्यंत ओळख होती.
हे देखील पहा -
सुमंत यांच्या अचानक जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. सुमंत यांच्या पश्च्यात वृद्ध वडील, पत्नी आणि दोन मुले आहेत. कुटुंब प्रमुखच निघून गेल्याने आता जगायचे कसे ? हा मोठा प्रश्न कुटुंबासमोर उभा राहिला आहे.
सुमंत रुईकर हे 1995 पासून शिवसेनेत कार्यरत आहेत. बीड जिल्ह्यात मदतीला धावून जाणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. सामाजिक असो आरोग्यदायी का असो, कुठल्याही अडीअडचणीला सुमंत हे धावून जायचे आणि पीडित लोकांना मदत मिळवून द्यायचे. शिवसेनेत शिवसैनिक म्हणून काम करत असताना त्यांनी कुटुंबाची कधीही पर्वा केली नाही. संपूर्ण समाजाला रुईकर कुटुंब म्हणायचे, मात्र त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांचं कुटुंब पोरके झाले आहे. 26 वर्ष शिवसेनेसाठी अहोरात्र काम करत असताना शिवसेनेने आता सुमंत यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावं. अशी मागणी नातेवाईक करीत आहेत.
दरम्यान, लाडक्या नेत्याला दीर्घायुष्य मिळावं म्हणून अहोरात्र देवाकडे पाठपुरावा करत असताना सुमंत हे काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या जाण्यानंतर त्यांचं कुटुंब मात्र बेघर झाले, एरवी सर्वसामान्यांना मदत करणारी शिवसेना आज सुमंत रुईकर यांच्या कुटुंबालाही तेवढीच मदत करेल अशी अपेक्षा आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.