पत्नीवर चारित्र्याच्या संशयातून एस आर पी एफ जवानाने केला गोळीबार; एक जण जागीच ठार Saam Tv
महाराष्ट्र

पत्नीवर चारित्र्याच्या संशयातून एस आर पी एफ जवानाने केला गोळीबार; एक जण जागीच ठार

पत्नीवर चारित्र्याच्या संशयावरून करण्यात आलेल्या गोळीबारत एकजण जागीच ठार

विश्वभुषण लिमये

सोलापूर : सोलापुरातील बार्शी तालुक्यामधील भातांबारे गावात गोरोबा महात्मे या एस आर पी एफ जवानाने पत्नीवर चारित्र्याच्या संशयावरून करण्यात आलेल्या गोळीबारात एकजण जागीच ठार झाला आहे. तर एकावर सोलापुरातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

हे देखील पहा-

पत्नीवर असणाऱ्या चारित्र्याच्या संशयावरून बोलण्यासाठी जवानाचे सासरचे मंडळी काल भातांबारे गावी आले होते. मात्र, बोलणं फिसकटल्यामुळे जवानाने रागाच्या भरात सरकारी पिस्तूलचे ४ राउंड फायर करण्यात आले. यामध्ये जवानाच्या मेहुण्याच्या मित्राचा जागीच मृत्यू झाला आहे. नितीन भोसकर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर बालाजी महात्मे असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.

या प्रकरणी गोरोबा महात्मे या एस आर पी एफ जवानाला वैराग पोलिसांनी रात्रीच अटक केली आहे. घटनास्थळावरून एक सरकारी पिस्तूलसह २६ जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत. वैराग पोलीस स्टेशनमध्ये आरोपी गोरोबा महात्मेवर भारतीय दंड संहिता कलम 302, 307, 504 आणि शस्त्र अधिनियम कलम 3, 25, 27 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stye Eye Care : डोळ्याला रांजणवाडी येण्याआधी दिसतात 'ही' ६ लक्षणे, वेळीच जाणून घ्या नाहीतर...

Sindhudurg Fort : सिंधुदुर्गच्या समुद्रकिनाऱ्यावरील छुपा किल्ला; इतिहासात दडली आहेत रहस्ये, अनुभवाल नजरेत भरणारे सौंदर्य

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रायगडमधून दरे गावाकडे रवाना

Good News: ST प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, घरबसल्या NCMC कार्ड रिचार्ज करता येणार; कसं ते वाचा...

Shiv Sena Symbol Hearing: दोन्ही शिवसेनेने बाळासाहेबांच्या नव्हे, तर स्वतःच्या बळावर लढावे; सुप्रीम कोर्ट

SCROLL FOR NEXT