Nagpur News, Latest Marathi News, Ganpati Murti For Ganesh Chaturthi, Ganpati Idol, Ganesh Chaturthi 2022 Saam Tv
महाराष्ट्र

नागपुरात गणेशमुर्तींचा आकार ४ फूट; मनपा आयुक्तांचे निर्देश

बाप्पाच्या मुर्तीचा आकार वाढवा; गणेशोत्सव मंडळाची मागणी

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर - महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असणारा श्री गणेशोत्सव (Ganeshotsav) पुढील महिन्याच्या अखेरीस येत असून, या निमित्ताने श्री गणरायाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र तयारीला लागला आहे. गणेशोत्सवात मंडळांना बाप्पाच्या मुर्तीसाठी चार फुटांची मर्यादा लादण्यात आली आहे. अधिक उंचीची मूर्ती स्थापित करता येणार नाही. याबाबत मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी परिपत्र काढून दिशानिर्देश जारी केले आहे. ((Ganesh Chaturthi 2022)

मनपा आयुक्तांच्या या निर्णयाविरोधात नागपुरातील (Nagpur) मुर्तीकार, गणेशोत्सव मंडळ आणि भाजपंही आक्रमक आहे. बाप्पाच्या मुर्तीची चार फुटांची अट शिथील करावी, या मागणीचं निवेदन देण्यात आलं आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोना संकटामुळे नागपूरात गणेशोत्सवावर अनेक निर्बंध होती. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने यंदा धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होणार, अशीच भावना होती.

हे देखील पाहा -

मात्र मनपा आयुक्तांनी चार फुटाची मर्यादा घातल्याने, भाजप पदाधिकारी संतप्त झाले आहे. याबाबत आज भाजप नेते माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनपा पदाधिकाऱ्यांची भेट घेतली, आणि एक दिवसांत चार फुटाची अट शिथील करण्याची मागणी केली आहे. नगरपरिषदच्या निवडणूका पुढे ढकलाव्यात यासाठी आज राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना निवेदन देणार, असंही यावेळी बावनकुळे म्हणाले. (Ganpati Murti For Ganesh Chaturthi)

तसेच पर्यावरण हित लक्षात घेऊन यंदा गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसने घडवलेल्या गणेश मूर्तीची विक्री अथवा खरेदी करु नये, त्याऐवजी शाडू मातीची गणेश मूर्ती स्थापन करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्तीचे अनेक दुष्‍परिणाम आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिस पाण्‍यात विरघळत नाही. त्‍यामुळे अशा मूर्तीचा गाळ विहीर, तलाव आणि जलाशय यांच्या तळाशी साचतो. यामुळे जलाशयातील जिवंत झरे बंद होतात. तसेच प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीवरील रासायनिक रंगामुळे जल प्रदूषण होऊन जलचरांना देखील धोका निर्माण होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv Crime : बँकेची लोखंडी खिडकी तोडून चोरट्यांचा आत प्रवेश; दरोड्याचा प्रयत्न फसला

Sangali Nag Panchami : सांगलीकरांची २३ वर्षांची प्रतीक्षा संपली, जिवंत नाग पकडण्याला परवानगी, नेमकं प्रकरण काय?

Honey Trap : नाशिकनंतर सांगलीतही हनी ट्रॅप, २ माजी मंत्र्यांचा सहभाग, खडसेंचा खळबळजनक दावा

Maharashtra Live News Update : माणिकराव कोकाटे अजित पवारांच्या भेटीसाठी रवाना, राजीनामा देणार का?

Blocked heart arteries: शरीरात होणारे 'हे' 5 बदल सांगतात हृदयाच्या नसा झाल्यात ब्लॉक; लक्षणं वेळीच ओळखून करा उपचार

SCROLL FOR NEXT