Shivsena MLA Saam TV
महाराष्ट्र

...त्यामुळे मी नाराज; शिंदेंसोबत गुवाहाटीत असणाऱ्या आमदाराने सांगितलं कारण

'एकनाथ शिंदेंकडे जाऊन थोडाफार निधी मिळत होता , त्यांच्या मदतीने मतदार संघात काही काम करू शकलो.'

संजय जाधव

बुलढाणा : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) त्यांच्या आमदारांना जसा तत्काळ निधी उपलब्ध करून देतात, तसा शिवसेनेत निधी उपलब्ध होत नाही. म्हणून आपण नाराज असल्याचं स्पष्टीकरण शिवसेनेचे नाराज आणि सध्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत असणारे आमदार डॉ.संजय रायमूलकर (MLA Dr. Sanjay Raymulkar) यांनी साम टीव्हीशी बोलताना दिलं आहे.

मागील अनेक दिवसांपासून राज्यातील सरकारमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना, सत्तेतला मोठा भागीदारी पक्ष हा शिवसेना असताना देखील राष्ट्रवादीच्या (NCP) तुलनेत शिवसेनेच्या आमदारांची काम होतं नाहीत. आमदारांना निधी दिला जात नाही. त्यामुळे शिवसेना (Shivsena) आमदार नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. शिवाय याबबात त्यांनी मुख्यमंत्र्याकडे वेळ देखील मागितला होता.

हे देखील पाहा -

याच प्रकऱणावर आज मेहकरचे शिवसेना आमदार डॉ. संजय रायमूलकर यांनी आपली नाराजी निधी वाटपावरुन असल्याचं सांगितलं आहे. आमदारांशी सामच्या प्रतिनीधींनी फोनवरून संपर्क साधला असता रायमूलकर यांनी आपण गुवाहाटी (Guwahati) येथील हॉटेलमध्ये असून आनंदात असल्याचंही सांगितलं.

यावेळी त्यांनी आपण नाराज का आहात? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की , 'मतदार संघातील विकास कामांना जसे लोणार सरोवर विकास , पेन टाकळी प्रकल्प यासाठी अनेकदा प्रयत्न करूनही विकास निधी मिळत नव्हता, ज्या प्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आमदारांना तत्काळ विकास निधी उपलब्ध करून देत असतात तसं शिवसेनेत होत नाही, म्हणून मी नाराज होतो , एकनाथ शिंदेंकडे जाऊन थोडाफार निधी मिळत होता , त्यांच्या मदतीने मतदार संघात काही काम करू शकलो. असल्याचा खुलासा देखील त्यांनी यावेळी केला.

Edited By -Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT