आष्टा येथे शाळेची व्हॅन कॅनॉलमध्ये कोसळली; 11 विद्यार्थी जखमी Saam Tv
महाराष्ट्र

आष्टा येथे शाळेची व्हॅन कॅनॉलमध्ये कोसळली; 11 विद्यार्थी जखमी

आष्टा या ठिकाणी क्लेरमोंट शाळेची व्हॅन (MH. १०. AW- ५०९४) कॅनॉलमध्ये कोसळल्यामुळे ११ विद्यार्थी जखमी झाले आहेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सांगली : आष्टा या ठिकाणी क्लेरमोंट शाळेची व्हॅन (MH. १०. AW- ५०९४) कॅनॉलमध्ये कोसळल्यामुळे ११ विद्यार्थी जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये व्हॅनचा चालक आणि सहाय्यक महिला देखील जखमी झाली आहे. काल सकाळी ८ वाजेच्या सुमारास आष्टा- मर्दवाडी रोडवर हा अपघात झाला आहे.

मिरजवेसकडून एक पिवळ्या रंगाची टाटा मॅजिक कंपनीची स्कुल व्हॅन भरधाव वेगाने पुलाच्या संरक्षक दगडाला थटून कॅनॉलमध्ये कोसळली आहे. यावेळी परिसरामधील शेतकऱ्यांनी जखमी विद्यार्थ्यांना कॅनॉलमधून बाहेर काढले आहे. ११ विद्यार्थी, ड्रायव्हर आणि सहाय्यक महिलेस बाहेर काढून उपचाराकरिता हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे.

हे देखील पहा-

यामध्ये प्रियांशी संदीप फडतरे (वय- ११, रा. तुंग) हिच्या उजव्या खांद्याला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे. शरण्या प्रफुल्लकुमार खोत (वय ५, सिनियर के.जी.) हिला डाव्या हाताच्या मनगटास मार लागला आहे. नंदिनी प्रवीणकुमार गायकवाड (वय ५,रा. आष्टा) हिच्या डोक्याला मार लागला आहे. मनस्वी रवींद्र नलवडे (वय ७, सिनियर केजी) हिच्या डाव्या हाताचे मनगट आणि कमरेला मार लागला आहे.

तसेच इतर ७ विध्यार्थ्यांना हात, पायास आणि डोक्यास दुखापत झाली आहे. व्हॅनमधील मावशी वैशाली राजेंद्र झिनगे यांना हाताला आणि पायाला खरचटून मुका मार लागला आहे. चालक ओंकार जयवंत घेवदे (रा. अंकलखोप, तालुका- पलूस) याना हातापायास मुकामार लागल्याने तो जखमी झाला आहे. सदर व्हॅन सचिन मिलिंद लांडगे (रा. अंकलखोप) यांची आहे.

दरम्यान, चालक ओंकार जयवंत घेवदे (रा. अंकलखोप) याच्याविरुद्ध रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने व्हॅन चालवून विद्यार्थ्यांना जखमी करण्यास कारणीभूत धरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभय राजकुमार चौगुले यांनी आष्टा पोलीस ठाण्यात ही फिर्याद दिली आहे. आष्टा पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मीठमुंबरी-बागवाडी जेटीवरील बोटिंग प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Shraddha Dubey: मॉडेलिंगच्या नावाखाली काळा धंदा! ब्लॉगरच्या फ्लॅटवर छापा पडताच समोर आला धक्कादायक प्रकार

Congress Protest Live Update : मोदी सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवत आहे - राहुल गांधी

ज्ञानेश कुमारांना सोडणार नाही! सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार; राहुल गांधींचा सर्वात मोठा निर्णय

Mobile Use In Toilet: टॉयलेटमध्ये मोबाईल वापरल्याने होऊ शकतो मूळव्याध, आजपासून सोडी ती वाईट सवय

SCROLL FOR NEXT