Ratnagiri अमोल कलये
महाराष्ट्र

लग्नासाठी आलेल्या जावयावर काळाचा घाला; रत्नागिरीत घडली दुर्देवी घटना

अनंत तेरवणकर असं मृत व्यक्तीचं नाव असून ते रत्नागिरीतील कोळंबे येथे लग्नासाठी गेले होते.

अमोल कलये.साम टीव्ही रत्नागिरी

रत्नागिरी : सध्या लग्नसराईचे दिवस असून मोठ्या प्रमाणात लग्न संमारंभ पार पडत आहेत. लग्न संमारंभासाठी अनेक लोक आपआपल्या नातेवाईकांच्या घरातील लग्न समारंभांना उपस्थिती लावण्यासाठी जात असतात. अशाच एका लग्न समारंभासाठी आलेल्या जावयाचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रत्नागिरीतील (Ratnagiri) कोळंबे गावात घडली आहे.

अनंत तेरवणकर असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. रत्नागिरीतील कोळंबे येथे लग्न होते. या लग्न समारंभासाठी अनंत तेरवणकर व त्यांचे कुटुंबीय गेले होते. लग्न समारंभ आटपून अनंत तेरवणकर कोळंबे येथे फिनोलेक्स कंपनीने बांधलेल्या धरणात अंघोळीसाठी गेले होते.

हे देखील पाहा -

मात्र, अंघोळ करत असताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते बुडू लागले आहेत हे धरणाजवळ कपडे धुवायला गेलेल्या महिलांनी पाहिलं. दरम्यान, या महिलांनी गावात येऊन सदर घटनेची माहिती गावातील ग्रामस्थांना दिली. गावातील लोकांनी धरणाकडे धाव घेत अनंत तेरवणकर यांना पाण्यातून बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rain: पुण्यासाठी पुढचे ३ तास महत्वाचे, वादळी वाऱ्यासह पाऊस झोडपून काढणार

Gulab Kulfi Recipe : उन्हाळ्यात करा आईस्क्रीम पार्टी, घरीच झटपट बनवा थंडगार 'गुलाब कुल्फी'

BMC News Mumbai: भाजप नगरसेवकाचा मोठा निर्णय; ५ वर्षांचं मानधन, भत्ते महापौरनिधीला देणार, इतर नगरसेवकांची भूमिका काय?

Mangalsutra Designs: 4 ते 5 ग्रॅममध्ये सोन्याच्या मंगळसूत्राचे 5 लेटेस्ट डिझाईन्स, लूक दिसेल सुंदर आणि राजेशाही

Maharashtra Live News Update: मालवणीत ३७ किलो गांजा जप्त; ३ जणांना अटक

SCROLL FOR NEXT